Mumbai News : मुंबईकरांनो, कबुतरांपासून दूर राहा! कारवाईसाठी क्लीनअप मार्शल तयार

BMC Action Against Feeding Pigeons : कबुतरांना उघड्यावर चणे खायला टाकल्यास कारवाई दंडात्मक करणार
Kabutarkhana, BMC
Kabutarkhana, BMCSarkarnama
Published on
Updated on

Mumbai Pigeon Feeding News : मुंबईकरांनो, भूतदया म्हणून तुम्ही कबुतरांना रस्त्यावर किंवा उघड्यावर खायला देत असाल तर सावधान..! कारण कबुतरांना उघड्यावर चणे खायला देणाऱ्यांवर मुंबई महापालिका कारवाईचा बडगा उगारणार आहे.

त्याला कारणही तसेच आहे. कबुतरामुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळते. म्हणूनच अशी भूतदया दाखवणाऱ्यांवर मुंबईत आता क्लीनअप मार्शलची नजर असणार आहे.

मुंबईत अनेक ठिकाणी कबुतरखाने आहेत. अगदी उदाहरण द्यायचे तर दादरमधील कबुतरखाना. तसेच फोर्ट, दादर, माटुंगा शिवाय पश्चिम उपनगरातही अनेक ठिकाणी कबुतरखाने आहेत किंवा कबुतरांनासाठी उघड्यावर चणे किंवा इतर खाद्यपदार्थ टाकले जातात.

याचा उपद्रव आजूबाजूला राहणाऱ्या लोकांना होतो. म्हणूनच यापुढे कबुतरांना उघड्यावर खायला टाकताना आढळल्यास त्यांच्यावर 100 ते 500 रुपयांचा दंड वसूल केला जाणार आहे. यासाठी महापालिकेच्या प्रत्येक वॉर्डामध्ये क्लीनअप मार्शलची गस्त घालणार आहेत.

Kabutarkhana, BMC
Kokan University of Fishery : मासे कोकणात, मत्स्य विद्यापीठ नागपुरात; डॉ. मुणगेकर समितीचा अहवाल कुणी दडपला?

कबुतरांमुळे काय होते?

कबुतरांच्या विष्ठेमुळे अनेक आजारांना फुकटात आमंत्रण मिळते. यात श्वसनाचा आजार मुख्य आहे. दम्याचा (अस्थमा) आजार असलेल्यांना कबुतरांची विष्ठा अधिक त्रासदायक असते. कबुतरांच्या पिसांसह त्यांच्या विष्ठेतून बाहेर पडणाऱ्या जंतुंमुळे हायपर सेन्सिटिव्ह न्युमेनिया होण्याचे प्रमाण वाढत आहे.

शिवाय फुफ्फुसांना सूज येणे, त्वचेची अ‍ॅलर्जी, श्वासनलिकेला सूज, सायनसायटिस, डोळे लाल होणे असे अनेक आजार बळावण्याचा धोका कबुतरांमुळे आहे. शिवाय दुर्गंधी पसरून अस्वच्छता पसरते ज्याचा सर्वांनाच त्रास होतो.

तक्रारींमुळे कारवाई

वास्तविक कबुतरांमुळे स्थानिकांना खूप त्रास होतो. लोक पुण्यकर्म म्हणून कबुतरांना चणे, धान्य टाकतात. पण त्याचवेळी त्या परिसरात राहणाऱ्यांना विचार होत नाही. त्यामुळे स्थानिकांकडून महापालिकेकडे वारंवार तक्रारी येत असतात. पण महापालिका कोणतीही कारवाई करत नाही. त्यावर आता दंडात्मक कारवाईचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ठाणे, नवी मुंबईतही कबुतरांची समस्या

विशेष म्हणजे यंदा मार्चमध्ये ठाणे महापालिका आणि नवी मुंबई महापालिकेनेही कबुतरांना उघड्यावर खायला टाकू नका, असे आवाहन केले होते. कबुतरांमुळे अनेक आजार पसरतात, याकडे नवी मुंबई महापालिकेच्या पशू वैद्यकीय विभागाने लक्ष वेधले होते. पण या आवाहनांचा काहीही उपयोग झालेला नाही.

ठाण्यात हरिनिवास सर्कल, जांभ‌ळी नाक्याजव‌ळील धान्य बाजारपेठेत कबुतरखाने आहेत. शिवाय वागळे इस्टेट परिसरातही कबुतरखाने आहेत. उपवनमधील पायलादेवी मंदिर परिसर, बाळकुम, कळवा, खेवरा सर्कल येथेही कबुतरखाने आहेत.

अनेक व्यापारी कबुतरांना खायला फूटपाथवर धान्य टाकतात. एकदा ही सवय झाली की मोठ्या संख्येने कबुतरे येऊ लागतात. हे करताना इतरांचा विचार होत नाही. म्हणून मुंबई महापालिकेने दंडात्मक कारवाईचा निर्णय घेतला आहे.

(Edited by Avinash Chandane)

Kabutarkhana, BMC
Mlas Disqualification Case : शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी मोठी अपडेट समोर; विधानसभा अध्यक्षांनी दिली माहिती

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com