
Assembly winter session
sarkarnama
मुंबई : विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे (Assembly Winter Session) कामकाज बुधवारी सुरू झाली. या अधिवेशनात भाजपकडून (BJP) महाविकास आघाडी सरकारला अनेक मुद्यांवर घेरले जाणार असल्याचे संकेत आधीच दिले आहेत. तर सरकारनेही विरोधकांचा हल्ला परतवून लावण्याची जय्यत तयारी केली आहे. अधिवेशन सुरू झाले त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सभागृहात अनुपस्थित आहेत.
विधानसभेचे अध्यक्ष नरहरी झिरवळ (Narhari Zirawal) यांनी यांनी सुरूवातीला नवनिर्वाचित सदस्य जितेश अंतापूरकर (Jitesh Antapurkar) यांचा परिचयाने कामकाजाची सुरूवात केली. पण लगेचच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पॉईंट ऑफ प्रोसिजर मांडत कामकाज पत्रिकेवरून सरकारला प्रश्न केला. पहिल्याच दिवशी कामकाज पत्रिकेवर 12 बिले विचारार्थ मांडण्यात आल्याबाबत त्यांनी टीका केली.
फडणवीस म्हणाले, पहिल्या दिवशी केवळ शोक प्रस्ताव देतो, पण गेले अनेक अधिवेशन कामकाज होत नाही, लक्षवेधी, प्रश्नोत्तरे होत नाही. त्यामुळे मी आग्रह केला होता की, पहिल्या दिवशीही प्रश्नतोत्तर आणि लक्षवेधी घेतल्या पाहिजेत. सरकारनेही हे मान्य केले होते. पण आज कामकाजपत्रिकेवर 12 बिले विचारार्थ मांडण्यात आली आहेत. आजच बिले मांडायची आणि आजच विचारार्थ ठेवायची, ही नवीन पध्दत सुरू झालीय.
सदस्यांनी बिले वाचायचीच नाहीत का, ही कुठली पध्दत आहे. एक दिवसाचे अधिवेशन होते, त्यावेळी हे मान्य होते. पण पाच दिवसाचे अधिवेशन असताना हे असं का? ही योग्य पध्दत नाही. त्याचा खुलासा करायला हवा. बिले महत्वाची आहेत, आम्हाला वाचायची आहेत, असं स्पष्ट करत फडणवीस यांनी आज प्रश्नोत्तरे आणि लक्षवेधी घेण्याची विनंती केली.
फडणवीसांच्या या मागणीवर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, सरकारची हीच भूमिका आहे. कामकाजपत्रिकेनुसार सर्व कामकाज होईल. शासकीय विधेयके ब पर्यंतच घ्यावीत, त्यानंतर शोक प्रस्ताव घ्यावा, हे सरकारला मान्य आहे. त्यानुसार परवानगी देण्याची विनंती पवार यांनी अध्यक्षांकडे केली. त्यानंतर संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी जितेश अंतापूकर यांचा परिचय करून दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.