Maharashtra Bhushan 2022 : यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना जाहीर!

Maharashtra Bhushan 2022 : आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा सन्मान!
Maharashtra Bhushan 2022 :
Maharashtra Bhushan 2022 :Sarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Bhushan 2022 : यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना जाहीर झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shiunde) यांच्याकडून ही घोषणा करण्यात आली. महाराष्ट्र भूषण पुरस्कार निवड समितीमार्फत केले या शिफारशीवर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी अखेर आज मोहोर उमटवली. आज विशेष म्हणजे आज रेवदंडा येथे जाऊन मुख्यमंत्र्यांनी धर्माधिकारी यांची विशेष भेटही घेतली.

ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा जन्म १४ मे १९४६ रोजी जन्म झाला. याआधी त्यांना केंद्र सरकारकडून पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे. त्यांचं पूर्ण नावा डॉ.दत्तात्रेय तथा आप्पासाहेब धर्माधिकारी आहे. गेली तीस वर्षे ते निरूपणाचे कार्य करत आहेत. अंधश्रध्दा दूर करणे, बालमनावर संस्कार करणे,आदिवासी प्रदेशात व्यसनमुक्ती इत्यादी महत्त्वाचे कार्य ते सातत्याने करत आहेत.

Maharashtra Bhushan 2022 :
Smriti Irani News : राहुल गांधींच्याविरोधात स्मृती इराणी मैदानात; म्हणाल्या...

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी कार्यक्रम नेहमी राबवले जातात. नुकतेच या संस्थेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर वृक्षरोपण करण्यात आले. वृक्षसंवर्धन करणे, तलाव शुद्ध करणे, स्वच्छता अभियान राबवणे, रक्तदान शिबिर आयोजित करणे इत्यादी कार्य सातत्याने केले जातात. गणेश उत्सव, नवरात्र महोत्सव, कचऱ्यातून खत तयार करणे इत्यादी पर्यावरणपूरक संदेश दिले जातात. आप्पासाहेब धर्माधिकारी यांची एक ओळख स्वच्छतादूत म्हणूनही आहे.

Maharashtra Bhushan 2022 :
Satyajeet Tambe News: अखेर सत्यजीत तांबेंचं स्वप्नं पूर्ण;आमदारकीची घेतली शपथ,पण...

कोकणातील रायगड जिल्ह्यातील रेवदंडा या गावी आप्पासाहेब यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण झाले. लहानपणापासून आप्पासाहेब यांना कीर्तन ,भजन, अध्यात्मिक गोष्टींचा ओढा होता. तळागाळातील शेवटच्या माणसांसाठी, समाजाच्या सेवेचा वसा यासाठी आप्पासाहेबांनी आपले संपूर्ण जीवन काम करत आहेत.

समाजसेवेची या कार्याची सुरूवात त्यांच्या घरात त्यांचे वडील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांनी केली. १९४३ त्यांच्या वडीलांनी या कार्याची सुरूवात केली होती. हाच वारसा आप्पासाहेबांनी पुढे चालवाला.यासाठी ते काम करत आहेत. आज महाराष्ट्र पुरस्कार हा देवून त्यांच्या कार्याचा यथोचित सन्मान करण्यात आला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com