Satyajeet Tambe News: अखेर सत्यजीत तांबेंचं स्वप्नं पूर्ण;आमदारकीची घेतली शपथ,पण...

Mumbai News : सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर काँग्रेसमधील वाद चव्हाट्यावर आला होता...
Satyajeet Tambe
Satyajeet TambeSarkarnama
Published on
Updated on

Nashik Graduate Election : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सत्यजीत तांबे यांनी दणदणीत विजय मिळवत महाविकास आघाडीच्या शुभांगी पाटील यांना पराभवाचा धक्का दिला होता. अखेर तांबे यांनी विधानपरिषदेच्या आमदारकीची शपथ घेतली आहे.यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह माजी मंत्री व काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण हे उपस्थित होते. पण माजी मंत्री व काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली.

सत्यजीत तांबे यांनी विधान परिषदेच्या आमदारकीची शपथ घेतली आहे. तांबे हे शपथविधीसाठी पुढे आले असतानाच त्यांच्या समर्थकांनी एकच वादा सत्यजीतदादा अशी घोषणाबाजी केली. यानंतर सभागृहातील इतर कार्यकर्त्यांनी एकच वादा… अजितदादा अशी घोषणाबाजी केली.  पहिलेदादा अजितदादा तर दुसरेदादा सत्यजीत दादा…आणि एकच वादा सत्यजीत दादा अशा घोषणाबाजींने शपथविधी सोहळ्याचे स्थळ दुमदुमून गेल्याचे पाहायला मिळाले. तांबेंच्या विजयामागं भाजप असल्याची चर्चा सुरु असतानाच अजित पवारांच्या नावानं घोषणा दिल्यानं राष्ट्रवादीनेही जोर लावल्याचं बोललं जात आहे.

Satyajeet Tambe
Ajit Pawar : अश्लील नृत्यांच्या कार्यक्रमांना यापुढं थारा नाही; राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना अजित पवारांचा इशारा

काँग्रेसमधून बंड करत सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर संपूर्ण राज्याचं लक्ष या निवडणुकीच्या निकालावर लागले होते. महाविकास आघाडीनं पाठिंबा दिल्यानंतर उमेदवार शुभांगी पाटील यांच्याकडून वारंवार विजयाचा दावा सांगण्यात येत होता. मात्र, प्रत्यक्ष निवडणुकीत तांबे यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांचा पराभव केला आहे.

सत्यजीत तांबे यांनी पाचव्या फेरीअखेर एकूण ६८ हजार ९९९ मतं मिळवली आहे. तर शुभांगी पाटील यांना केवळ ३९ हजार ५३४ मतांवर समाधान मानावं लागलं आहे. पाटील यांचा तब्बल २९ हजार ४६५ मतांनी दारूण पराभव झाला आहे.

काँग्रेसने डॉ. सुधीर तांबे (Sudhir Tambe) यांना उमेदवारी दिली होती. मात्र, त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल न करता, सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती.

सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर काँग्रेसमधील वाद चव्हाट्यावर आला होता. नाना पटोले यांनी तांबे हे काँग्रेसचे उमेदवार नाहीत असं स्पष्ट केलं होतं. तसेच पक्षाला धोका दिल्याचा गंभीर आऱोप करत तांबे पिता पुत्रांचं पक्षातून निलंबन देखील करण्यात आलं होतं. यानंतर आरोप प्रत्यारोपांनी राजकारण चांगलंच पेटलं. बाळासाहेब थोरातांनी देखील पटोले यांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करत पक्षश्रेष्ठींना पत्र लिहिलं होतं. तसेच विधीमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा देखील दिला आहे.

Satyajeet Tambe
CM Fellowship Program : शिंदे-फडणवीस सरकारसोबत काम करायचं ? ; तर मग हे वाचाच

नाशिक पदवीधर निवडणुकीत भाजपने आपला उमेदवारच जाहीर केला नव्हता. त्यामुळे भाजप कुणाला उमेदवारी देणार याकडेही सर्वांचं लक्ष लागलं होतं. पण दुसरीकडे भाजपने छुप्या पद्धतीनं सत्यजीत तांबे यांना पाठिंबा दिल्याचीही नाशिकमध्ये चर्चा होती. इतकेच नव्हे तर कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचे कट्टर प्रतिस्पर्धी मानले जाणारे राधाकृष्ण विखे-पाटील यांनीही या निवडणुकीत अप्रत्यक्षपणे सत्यजीत तांबे यांना मदत केली. त्यांच्या भाजप प्रवेशाचीही जोरदार चर्चा होती.मात्र,त्यांनी आपली पुढील वाटचाल अपक्ष म्हणूनच राहील असं जाहीर केलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com