शेलारांनी मुनगंटीवारांसह चंद्रकांतदादांनाही नाचवले; लाडांबरोबर धरला फुगडीचा फेर!

ढोल-ताशाच्या गजरात भाजप कार्यालयाच्या आवारात निवडणुकीतील यशाबद्दल आनंद साजरा करण्यात आला.
BJP Celebration
BJP CelebrationSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : उत्तरप्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमधील विजयाचे सेलिब्रेशन करीत राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या (bjp) नेत्यांनी शुक्रवारी (ता. ११ मार्च) ठेका धरला. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आशिष शेलार आणि नीतेश राणे यांचा डान्स साऱ्यांचे लक्ष वेधून घेत राहिला. यामध्ये प्रसाद लाड आणि शेलार यांनी तर फुगडीचा फेर धरला तर चंद्रकांतदादांनी शिटी वाजवत भाजपचा झेंडा नाचवत आनंद साजरा केला. या सेलिब्रेशनमध्ये शब्दशः बेभान होऊन नाचणारे शेलारे यांनी माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह चंद्रकांत पाटलांनाही नाचवले. (Maharashtra BJP strongly welcomes Devendra Fadnavis for his success in Goa)

ढोल-ताशाच्या गजरात भाजप कार्यालयाच्या आवारात निवडणुकीतील यशाबद्दल आनंद साजरा करण्यात आला. भाजप विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घौडदौड रोखण्याच्या हेतूने विरोधकांनी एकत्र येत ताकद पणाला लावली होती. त्यानंतरही पाचपैकी चार राज्यांमध्ये भाजपने एकहाती सत्ता काबीज केली आहे. गोव्यात तर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली निर्विवाद यश मिळाल्याने महाराष्ट्र प्रदेश भाजपमध्ये उत्साह संचारला आहे.

BJP Celebration
काँग्रेस-राष्ट्रवादी नाही; भाजपसाठी आता टार्गेट फक्त 'शिवसेना'च!

या निकालाचा आनंदोत्सव आणि फडणवीस यांचे कौतुक म्हणून भाजप नेत्यांनी विशेष सोहळ्याचे आयोजन केले होते, त्यासाठी पक्ष कार्यालयात नेते, कार्यकर्त्यांनी सकाळपासून प्रचंड गर्दी केली होती. हातात पक्षाचे झेंडे घेऊन आलेले शेकडो कार्यकर्ते ढोल-ताशाच्या गजरात निकालाचे स्वागत करीत होते. फडणवीस यांच्या स्वागतासाठी पक्षाचे १०५ आमदार एकत्र आले होते. त्यांच्यासमवेतच फडणवीस विधानभवनात गेले.

BJP Celebration
राजनाथसिंह यांच्या मुलाने मोडला अजितदादांचा बारामतीतील विक्रम!

त्याआधीच्या कार्यक्रमात चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, राणे यांच्यासह राज्याचे भाजपचे बहुतांशी नेते बेधुंद होऊन नाचल्याचे पाहायला मिळाले. यानिमित्ताने शक्तीप्रदर्शन करीत, राज्यातील ठाकरे सरकारला इशारा देण्याची संधीही भाजप नेत्यांनी साधली. सरकार आणि विरोधकांमध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये जोरदार संघर्ष होत असतानाच चार राज्यांतील कौल भाजपच्या बाजूने आल्याने आता महाराष्ट्रातही सरकार आणण्याचे संकेत भाजप नेत्यांकडून दिले जात आहे. त्यामुळे भाजपच्या या सेलिब्रेशनकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com