काँग्रेस-राष्ट्रवादी नाही; भाजपसाठी आता टार्गेट फक्त 'शिवसेना'च!

5 States assembly election | BJP | Mumbai Municipal corporation | फडणविसांनी फुंकलं मुंबई महापालिकेचे रणशिंग
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSarkarnama

मुंबई : राज्याचे विरोधी पक्ष नेते आणि गोव्याचे भाजप (BJP) प्रभारी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे आज मुंबई जंगी स्वागत करण्यात आले. काल उत्तर प्रदेशसह (UP Assembly Election result) गोवा, उत्तराखंड, मणिपूर आणि पंजाब विधानसभेचे निकाल लागले. या निकालांमध्ये पंजाब वगळता ४ राज्यांत भाजप बहुमताने सरकार स्थापन करणार आहे. यात गोव्याच्या यशाचे शिल्पकार भाजपने देवेंद्र फडणविस यांना घोषित केले आहे. या निकालानंतर आज देवेंद्र फडणविस यांचे मुंबईत आगमन झाले. यावेळी भाजपच्या सर्व आमदारांनी ढोल-ताशांच्या गजरात आणि पेढे वाटत फडणविसांचे स्वागत केले.

यावेळी बोलताना देवेंद्र फडणविस म्हणाले, आता आमची लढाईही मुंबई महानगरपालिकेसाठी असणार आहे. आम्ही कोणत्याही पक्षाच्या विरोधात नाही. आम्ही केवळ भ्रष्टाचार आणि लाचखोरीच्या विरोधात आहे. उत्तरप्रदेश तो झांकी है, महाराष्ट्र अभी बाकी है असे म्हणत त्यांनी राज्यातील सत्तांतराचाही इशारा दिला आहे. त्यामुळे आता मुंबई पालिका आणि महाराष्ट्र राज्य अशा दोन्ही ठिकाणी सत्ताधारी असलेल्या शिवसेनाला देवेंद्र फडणविस यांनी थेट इशारा दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com