Cabinet Meeting : आचारसंहिता लागण्यापूर्वीच्या ‘कॅबिनेट’मध्ये जोरदार खडाजंगी; ‘पॅकेज’च्या मुद्यावरून मंत्र्यांचा संताप

Cabinet Meeting Turns Heated Over Farmers’ Aid Discussion : शेतकऱ्यांना दिवाळीपर्यंत मदत देण्याचेही सत्ताधाऱ्यांकडून सांगण्यात आले होते. पण अनेक शेतकऱ्यांना अजूनही मदत मिळालेली नाही.
Cabinet Meeting
Cabinet MeetingSarkarnama
Published on
Updated on

Political Tensions Rise Ahead of Local Body Elections : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल आज वाजणार आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून आज नगरपालिका व नगरपंचायतींच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या जाऊ शकतात. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांची धाकधुक वाढली आहे. त्यातच निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत जोरदार खडाजंगी झाल्याचे वृत्त आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शेतकरी मदतीचा मुद्दा उपस्थित झाला होता. पावसामुळे राज्याच्या अनेक भागातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यासाठी राज्य सरकारने काही दिवसांपूर्वीच तब्बल 32 हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे.

शेतकऱ्यांना दिवाळीपर्यंत मदत देण्याचेही सत्ताधाऱ्यांकडून सांगण्यात आले होते. पण अनेक शेतकऱ्यांना अजूनही मदत मिळालेली नाही. राज्याच्या विविध भागातील शेतकरी अजूनही मदतीपासून वंचित आहेत. अनेक शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच गेली. त्याचे पडसाद आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत उमटले आहेत. विशेष म्हणजे मागील आठवड्यातही बैठकीत खडाजंगी झाली होती.

Cabinet Meeting
Prakash Surve News : ‘मराठी माझी आई, उत्तर भारत मावशी, आई मेली तरी चालेल..’ म्हणणाऱ्या शिंदेंच्या आमदाराने सामंतांशेजारी बसून जोडले हात

‘साम टीव्ही’ने दिलेल्या वृत्तानुसार, शेतकऱ्यांना मदत मिळण्यात होणाऱ्या विलंबावरून बैठकीत खडाजंगी झाली. मंत्र्यांकडून मदतीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचण्यास वेळ लागत आहे. याबाबत मंत्र्यांनी बैठकीत उघडपणे नाराजी व्यक्त केली. अधिकाऱ्यांकडून विलंब लावला जात असल्याचा ठपका काही मंत्र्यांकडून ठेवण्यात आला. शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळावी, अशी अपेक्षा मंत्र्यांनी व्यक्त केली.

शेतकऱ्यांना वेळेत मदत मिळत नसल्याने त्याचा फटका आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत बसू शकतो. अद्याप केंद्र सरकारकडूनही मदत जाहीर करण्यात आलेली नाही. केंद्रीय पथक आजपासून दोन दिवस नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहे. त्यानंतर केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला मदत केली जाईल. या सर्व बाबींचा निवडणुकीवर परिणाम होण्याची भीती सत्ताधारी पक्षांतील नेत्यांना आहे.

Cabinet Meeting
Tukaram Mundhe News : तुकाराम मुंढेंचा आयुक्तांच्या अधिकारांबाबत धडाकेबाज निर्णय; ‘हे’ पाऊल मोठा बदल घडविणार... 

दरम्यान, महिला विश्वचषकावर पहिल्यांदाच भारताचे नाव कोरणाऱ्या भारतीय संघाचे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अभिनंदन करण्यात आले. भारतीय संघातील महाराष्ट्राच्या खेळाडू स्मृती मानधाना, जेमिमा रॉड्रीग्ज आणि राधा यादव यांना या ऐतिहासिक विजयातील भागीदारीसाठी रोख पारितोषिकाने गौरवान्वित करण्याचा निर्णय देखील मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर करण्यात आला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com