राजकारण तापलं; कोल्हापूर उत्तरची खरी लढत दोन पाटलांमध्येच रंगणार!

कोल्हापूर उत्तरची पोटनिवडणूक जाहीर झाली असून, राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
Chandrakant Patil and Satej Patil
Chandrakant Patil and Satej PatilSarkarnama

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तरची पोटनिवडणूक जाहीर झाली असून, राजकीय घडामोडींना वेग आला आहे. ही निवडणूक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व पालकमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील (Satej Patil) आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी प्रतिष्ठेची केली आहे. काँग्रेसकडून दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नीची उमेदवारी निश्चित असली तरी भाजपनेही उमेदवार देण्याची तयारी केली आहे. यामुळे उमेदवार कुणीही असले तरी खरी लढत ही दोन पाटलांमध्ये होणार आहे.

कोल्हापूर उत्तरची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी सतेज पाटील प्रयत्नशील आहेत. याचवेळी भाजपकडून ही निवडणूक लढवण्याची तयारी सुरू आहे. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची ठरणार आहे. काँग्रेसकडून (Congress) दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री यांची उमेदवारी निश्‍चित आहे. भाजपकडून सत्यजित कदम आणि महेश जाधवांच्या नावांची चर्चा आहे. भाजपच्या (BJP) उमेदवारीची घोषणा उद्या (ता. १५) मुंबईत होणार आहे. याचबरोबर आम आदमी पक्षाचे पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाईही रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.

Chandrakant Patil and Satej Patil
मुख्यमंत्रिपदाचा तिढा सुटेना अन् राज्यपालांनी थेट विधानसभेचं अधिवेशन बोलावलं

या मतदारसंघात सतेज पाटील यांचा मोठा प्रभाव असलेला बावडा व लाईन बाजारचा भाग आहे. यामुळे या भागात मताधिक्य कोण घेणार, यावर निकालाचे चित्र अवलंबून असेल. तसेच, भाजप कुणाल उमेदवारी देते, यावरही लढतीचे चित्र अवलंबून असेल. सत्यजित कदम यांना उमेदवारी मिळाल्यास त्यांच्यावर महाडिक गटाचा शिक्का असल्याने सतेज पाटील या निवडणुकीसाठी पूर्ण ताकद लावतील. भाजपने निष्ठावंतांना डावलून कदम यांना उमेदवारी दिल्याचे पडसाद भाजपमध्येच उमटतील. पक्षांतर्गत विरोधकांचा सामना त्यांना करावा लागेल.

Chandrakant Patil and Satej Patil
विधानसभा निवडणुकीतील यशानंतर लगेचच मोदी सरकारचं जनतेला 'रिटर्न गिफ्ट'

शिवसेनेचा असाही वापर?

भाजपने चार राज्यांतील निवडणुकीत सत्ता मिळवल्याने पक्षाचा आत्मविश्‍वास वाढला आहे. सतेज पाटील हे निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र, देगलूर व पंढरपूरचा अनुभव पाहता भाजप बिनविरोधसाठी तयार होण्याची शक्यता दिसत नाही. राज्यातील सत्तेत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना एकत्र आहे. हिंदुत्त्ववादी मतांची विभागणी व्हावी, यासाठी शिवसेना व काँग्रेसमध्ये मैत्रीपूर्ण लढत व्हावी, यासाठीही दोन्ही काँग्रेसमधील काही नेत्यांचे प्रयत्न सुरू आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com