Drugs factories : महाराष्ट्राची वाटचाल महा'ड्रग्जनिर्मिती' राष्ट्राच्या दिशेने?

Drug Factory in Raigad seized : रायगड जिल्ह्यातील खालापूरमध्ये ड्रग्जनिर्मितीची फॅक्टरी उद्ध्वस्त करण्यात यश...
Drugs Factories, Devendra Fadnavis
Drugs Factories, Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

रायगड पोलिसांनी खालापूरमधील ड्रग्जनिर्मिती कारखान्यावर कारवाई केल्यानंतर महाराष्ट्रात खुलेआम ड्रग्जची निर्मिती होत असल्याला दुजोरा मिळाला आहे. पोलिसांनी काल (8 डिसेंबर) खालापूरमधील ढेकू गावातील लघुऔद्योगिक वसाहतीतील इंडिया इलेक्ट्रिक पोल्स मॅन्युफॅक्चरिंग कारखान्यावर छापा टाकला. तेव्हा तिथे मेफेड्रोन या अमली पदार्थाची निर्मिती केली जात असल्याचे उघड झाले. या कारखान्यातून पोलिसांनी तब्बल 107 कोटींचा एमडी ड्रग्जचा साठा जप्त केला असून, तिघांना अटक केली आहे.

गंभीर बाब म्हणजे दोन महिन्यांपूर्वी ड्रगमाफिया ललित पानपाटीलला अटक करण्यापूर्वी पोलिसांनी अनेक ठिकाणी ड्रग्जची निर्मिती केली जात असल्याचे उघडकीस आणले होते. त्यामुळे हे महाराष्ट्र आहे की 'महाड्रग्जनिर्मिती राष्ट्र' असा सवाल विचारला जात आहे. एकट्या ऑक्टोबर महिन्यात नाशिकमधील दोन ड्रग्जच्या फॅक्टरी पोलिसांनी उद्ध्वस्त केल्या. यातील पहिली कारवाई मुंबईतील साकीनाका पोलिसांनी केली, तर दुसरी कारवाई नाशिक पोलिसांनी केली. त्यानंतर सोलापूर, पैठण आणि मोखाड्यातील फॅक्टरीही उद्ध्वस्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.

Drugs Factories, Devendra Fadnavis
Drug Mafia Lalit Panpatil : ललित पानपाटीलच्या चौकशीत ‘बडी भाभी’, नेत्यांचे कनेक्शन उघड होईल का?

ललित पानपाटीलची नाशिकमधील फॅक्टरी

मुंबईच्या साकीनाका पोलिसांनी 7 ऑक्टोबरला नाशिक जिल्ह्यामधील शिंदे गावातील ललित पानपाटीलची ड्रग्ज फॅक्टरी उद्ध्वस्त केली. त्यावेळी फॅक्टरीतून तब्बल 300 कोटींचे ड्रग्ज जप्त केले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी नाशिक पोलिसांनी याच गावातील दुसऱ्या ड्रग्ज फॅक्टरी उद्ध्वस्त करून तेथून 250 कोटींचे ड्रग्ज हस्तगत केले. त्यानंतर नाशिकमधील ड्रग्ज फॅक्टरींवर कुणाचा वरदहस्त याविषयी राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले होते.

गिरणापात्रातून कोट्यवधींचे ड्रग्ज हस्तगत

ड्रगमाफिया ललित पानपाटीलने ड्रग्जचा साठा गिरणापात्रात फेकला होता. नाशिक पोलिसांनी त्याचा शोध घेताना सटाणा रोडवरील लोहणेर ठेंगोडा गावाजवळील गिरणा नदीपात्रातून तब्बल 100 कोटींचे ड्रग्ज हस्तगत केले. गोण्यांमध्ये भरून ललित पानपाटीलने ड्रग्ज नदीपात्रात टाकले होते.

सोलापूरमधील ड्रग्जनिर्मिती

मुंबई पोलिसांनी 16 ऑक्टोबर रोजी आणखी एक मोठी कारवाई केली. सोलापूर जिल्ह्यातील चिंचोलीमधील ड्रग्जनिर्मिती फॅक्टरीला टाळे लावून तेथून 100 कोटींचे ड्रग्ज ताब्यात घेतले. ज्या प्रमाणे ललित पाटीलच्या नाशिकमधील फॅक्टरीवर मुंबई पोलिसांनी कारवाई केली आणि स्थानिक पोलिसांना त्याचा पत्ताही नव्हता. तसेच या कारवाईबाबतही झाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पैठणलाही ड्रग्ज फॅक्टरीचा शाप

जितेशकुमार हिन्होरिया प्रेमजीभाई या अहमदाबादच्या माफियाचा छत्रपती संभाजीनगरमध्ये ड्रग्ज निर्मितीचा कारखाना होता. याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर 22 ऑक्टोबर रोजी छापेसत्र सुरू केले आणि 250 कोटींचे ड्र्ग्ज जप्त करण्यात आले. विशेष म्हणजे या कारवाईविषयी स्थानिक पोलिसांना कुठलीही माहिती नव्हती. अहमदाबाद डीआरआय आणि अहमदाबाद पोलिसांनी तीन वेगवेगळ्या ठिकाणी ही कारवाई केली.

चक्क फार्महाऊसमध्ये ड्रगची फॅक्टरी

पालघर पोलिसांनी 23 ऑक्टोबर रोजी मोखाड्याच्या फार्महाऊसमधील ड्रगची फॅक्टरी सील केली. दीड वर्ष या फॅक्टरीत ड्रग्जची निर्मिती केली जात होती. कारवाईत फॅक्टरीतून 36 कोटींचे ड्रग्ज ताब्यात घेण्यात आले.

या सर्व कारवाईनंतर अनेक प्रश्न उपस्थित होतात. एवढ्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात ड्रग्ज फॅक्टरी उभ्या कशा राहतात? या फॅक्टरींची कधी तपासणी होते की नाही? आणि एवढा खुलेआम बेकायदा व्यवहार सुरू असताना पोलिसांना याची खबरबात कशी लागत नाही? या प्रश्नांची उत्तरे कधी मिळतील हा भाग वेगळाच, पण पैशांच्या मोहातून देशातील पिढीला बरबाद करण्याचे षडयंत्र सुरू आहे, एवढे नक्की.

(Edited by - Avinash Chandane)

Drugs Factories, Devendra Fadnavis
BJP Politics: भाजपच्या कांदा निर्यातबंदीने शेतकऱ्यांमध्ये मोठा असंतोष!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com