Drug Mafia Lalit Panpatil : ललित पानपाटीलच्या चौकशीत ‘बडी भाभी’, नेत्यांचे कनेक्शन उघड होईल का?

Drug Mafia Lalit Panpatil, Will Police investigate political connection in Drug-ड्रगमाफिया ललित पानपाटील याचा आज सकाळी नाशिकच्या पोलिसांनी ताबा घेतला. त्याला आजच न्यायालयापुढे हजर केले जाण्याची शक्यता आहे.
Drug mafia Lalit Panpatil & Shivsena leader Sanjay Raut
Drug mafia Lalit Panpatil & Shivsena leader Sanjay RautSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics : शिवसेना नेते संजय राऊत यांनी ड्रग्ज माफिया ललित पानपाटील प्रकरणाशी जिल्ह्यातील मंत्र्याचा थेट संबंध असल्याचा आरोप केला होता. शहरातील एक महिला आमदारावर आरोप करीत त्यांचा उल्लेख बडी भाभी असा केला होता. त्यामुळे आता पोलिसांच्या तपासात त्याचा तपास होणार का? याची चर्चा आहे. (Shivsena and Congress leaders accuse on Minister as well rulling party political connection)

ड्रग्ज माफिया ललित पानपाटील (Crime) याचा ताबा आता नाशिक (Nashik) पोलिसांनी (Police) घेतला आहे. याबाबत शिवसेनेच्या (Shivsena) नेत्यांनी सत्ताधारी पक्षाच्या आमदार तसेच मंत्र्यांवर या प्रकरणाशी संबंध असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे नाशिक शहरात याबाबत नव्याने राजकारण सुरू होणार का? याची उत्सुकता आहे.

Drug mafia Lalit Panpatil & Shivsena leader Sanjay Raut
BJP Vs Congress Politics : भाजप कार्यकर्त्यांचा भल्या सकाळी काँग्रेस कार्यालयावर हल्ला बोल?

अमली पदार्थ तस्करी प्रकरणातील संशयित अक्षय नाईकवाडेला दोन दिवसांपूर्वी भोपाळमधून अटक केले होते. त्यानंतर आता या प्रकरणातील मुख्य संशयित पानपाटील याचा ताबा आज नाशिक पोलिसांनी घेतला आहे. त्यामुळे या गुन्ह्यातील महत्त्वाची माहिती पोलिसांना मिळण्याची शक्यता आहे.

यासंदर्भात शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे तसेच खासदार संजय राऊत यांनी सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांचा या प्रकरणाशी संबंध असल्याचा आरोप केला होता. त्यात शहरातील राजकीय नेत्या असलेल्या बडी भाभी कोण? याचा तपास लागायला पाहिजे, लअसे म्हटले होते. या प्रकरणात त्यांनी एकनाथ शिंदे गटाचे नेते व पालकमंत्री दादा भुसे यांच्यावर देखील आरोप केले होते. त्यामुळे शिवसेनेच्या दोन्ही गटांत त्यावरून चांगलेच राजकारण सुरू होते. आता मुख्य आरोपीच पोलिसांच्या हाती लागल्याने त्यात राजकीय नेत्यांचे संबंध उघड होतील का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

अमली पदार्थ विरोधी पथकाने शिंदे गावातील श्री गणेशाय इंडस्ट्रीजवर छापे टाकत येथून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ हस्तगत केला. दोन महिन्यांत या गुन्ह्याची व्याप्ती प्रचंड प्रमाणात वाढली आणि चौदापेक्षा अधिक संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला. यातील मुख्य संशयित म्हणून पानपाटील याचे नाव घेतले जाते. २ नोव्हेंबरला पुणे पोलिसांचे पथक ललित घेऊन नाशिकला येऊन गेले. त्यानंतर ललितकडून पोलिसांनी पाच किलो सोने जप्त केले होते. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी पानपाटीलला नाशिक पोलिसांच्या स्वाधीन केले.

Drug mafia Lalit Panpatil & Shivsena leader Sanjay Raut
BJP Politics : डॉ. भारती पवार झाल्या पहिल्याच टर्मला दोन खात्याच्या मंत्री!

पोलिसांनी ललितसह सुभाष मंडल, रौफ शेख, भूषण पाटील, अभिषेक बलकवडे, रेहान ऊर्फ गोलू अन्सारी, अरविंदकुमार लोहरे, प्रज्ञा कांबळे, जिशान शेख, शिवाजी शिंदे, राहुल पंडित यांना यापूर्वीच ताब्यात घेतले आहे. न्यायालयाने त्यांना कोठडी सुनावली आहे. संशयितांकडून दोन कोटी १४ लाख ३० हजार रुपयांचे मेफेड्रान जप्त करण्यात आले आहे. अमली पदार्थ विक्रीतून संशयितांनी खरेदी केलेली आठ किलो सोन्याची बिस्किटे, महागड्या मोटारी, मोबाईल असा पाच कोटी ११ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

Drug mafia Lalit Panpatil & Shivsena leader Sanjay Raut
Eknath Shinde : ठाकरे गटाने काढले हुकमी अस्त्र; शिंदेंवर बाजी उलटणार?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com