Eknath Khadse : एकनाथ खडसेंचा शिंदेंबाबत मोठा गौप्यस्फोट ; गुलाबराव पाटलांवरही निशाणा

एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनीही एकनाथ शिंदे यांच्या बंडावर भाष्य केले आहे.
Eknath Khadse, Eknath Shinde
Eknath Khadse, Eknath Shindesarkarnama
Published on
Updated on

मुक्ताईनगर (जळगाव) : एकेकाळी भाजपमध्ये ज्येष्ठ असलेले आणि मुख्यमंत्री पदाचे दावेदार असलेले व सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) विधानपरिषदेतील आमदार असलेल्या एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनीही एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडावर भाष्य केले आहे. ते मुक्ताईनगर येथे माध्यमांशी बोलत होते.

मुख्यमंत्री पदाचा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राजीनामा दिल्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे शिवसेनेतील (Shiv Sena) बंड पुन्हा नव्याने चर्चेत आले आहे. या बंडाबाबत एकनाथ खडसे यांनी गौप्यस्फोट केला आहे.

"एकनाथ शिंदे, त्यांचा गट आणि भाजप यांची युती आजची नाही. पाठिमागील प्रदीर्घ काळापासून ही युती चालत आली आहे," असे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. यानिमित्ताने खडसे यांनी माजी पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांच्यावरही निशाणा साधला आहे.

निर्णय यापूर्वीच

खडसे म्हणाले, "एकनाथ शिंदे यांनी आजवर भाजपवर केव्हाच टीका केली नाही.सत्तेत असतानाही त्यांनी भाजप आमदारांची कामे करण्यासच प्राधान्य दिले. त्यामुळे ही सलगी एका दिवसात नव्हे तर पाठीमागील अनेक महिन्यांपासून सुरु होती. भाजपसोबत जाण्याचा त्यांचा निर्णय यापूर्वीच झाला होता,"

Eknath Khadse, Eknath Shinde
एकनाथ शिंदेंना 'झेड' दर्जाची सुरक्षा ; फडणवीसांसोबत राजभवनावर जाणार

खडसेंनी यावेळी गुलाबराव पाटील यांच्यावर टीका केली. "केवळ एकनाथ शिंदेच नव्हे तर जळगावमधील नेते गुलाबराव पाटील यांचीही सलगी लपून राहिली नव्हती," असेही एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.

"आजवर भाजप नेते गिरीश महाजन यांनी शिवसेनेवर अनेकदा अगदी टोकाची, खालच्या पातळीवरची टीका केली. पण, शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी त्या टीकेला कधीही प्रत्युत्तर दिले नाही. त्यामुळे हिंदुत्त्व, राष्ट्रवादी काँग्रेसने निधी दिला नाही, हे केले जाणारे आरोप केवळ निमित्त आहेत. बंडखोर आमदारांचा भाजपसोबत जाण्याचा निर्णय अगोदरच झाला होता," असा गौप्यस्फोट खडसेंनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com