एकनाथ शिंदेंना 'झेड' दर्जाची सुरक्षा ; फडणवीसांसोबत राजभवनावर जाणार

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून तर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून उद्या शपथ घेतील.
Eknath Shinde, Devendra Fadnavis
Eknath Shinde, Devendra Fadnavissarkarnama

मुंबई : राज्यात आज होणारी फ्लोअर टेस्ट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर टळली आहे. यानंतर नव्याने सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू आहेत. शिंदे गटाचा मुक्काम गोव्यात आहे. या गटाचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे मुंबईच्या दिशेने सत्तास्थापनेच्या वाटाघाटींसाठी रवाना झाले आहेत. (Eknath Shinde latewst news)

"शिवसेनेचा गटनेता म्हणून ५० आमदारांनी माझी निवड केली आहे. मतदार संघातले काही प्रश्न होते. बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा विचार पुढे घेऊन जाऊ या, अशी आमची मागणी होती. यावर त्वरित निर्णय घेतला असता, तर ही वेळ आली नसती. आमच्या मनात उद्धव ठाकरे यांच्याबद्दल कालही आदर होता. आजही आदर आहे. मी मुंबईला राज्यपालांना भेटण्यासाठी जात आहे. त्यानंतर आमची पुढची रणनीती ठरवण्यात येईल," असे प्रतिपादन एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना केले. विमानाने ते मुंबईला येणार आहेत.

मुंबईत आल्यावर एकनाथ शिंदे यांना झेड श्रेणीची सुरक्षा देण्यात येणार आहे, या श्रेणीला सीआरपीएफचे सुरक्षा कवच देण्यात आले आहे, सध्या शिंदे हे एकटेच मुंबईला येत आहेत. राजभवनावर जाऊन देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे सरकार बनवण्याचा दावा करतील, उद्या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून तर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील, अशी माहिती सुत्रांनी दिली. ते आज 3 वाजता राजभवन येथे जाणार आहेत.

Eknath Shinde, Devendra Fadnavis
राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्यासाठी भाजप करणार शिवेंद्रराजेंना मंत्री

शिंदे म्हणाले, "भाजपसोबत कोणती आणि किती मंत्रीपदे याबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही, लवकरच होईल. तोपर्यंत कृपया मंत्रिपदाच्या याद्या आणि याबाबत पसरलेल्या अफवा यावर विश्वास ठेवू नका,"

तर दुसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले की, वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार, धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण, महाराष्ट्राचा सर्वांगिण विकास आणि आमदारांच्या मतदारसंघातील विकास कामे हाच आमचा फोकस आहे.

मुंबईत दाखल झाल्यावर शिंदे बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळी जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी तगडा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com