Eknath Shinde : वर्षावर रात्री खलबतं; १० कॅबिनेट, ३ राज्यमंत्रिपदं शिंदेंना मिळणार

Maharashtra Government Cabinet Expansion News: एकनाथ शिंदे हे मंत्रिपदावरुन नाराज होते, त्यांना गृहमंत्रीपद, नगरविकासखाते, महसूलखाते हवे आहे, ते आणखी काही खात्यासाठी आग्रही असल्याचे समजते.
Eknath shinde, Devendra Fadanvis
Eknath shinde, Devendra FadanvisSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात रात्री उशीरा खातेवाटपावरुन खलबतं झाली असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांकडून मिळत आहे. १० कॅबिनेट, ३ राज्यमंत्रिपदं शिंदे यांच्या वाट्याला येतील,अशी शक्यता आहे.

एकनाथ शिंदे हे मंत्रिपदावरुन नाराज होते, त्यांना गृहमंत्रीपद, नगरविकासखाते, महसूलखाते हवे आहे, ते आणखी काही खात्यासाठी आग्रही असल्याचे समजते. अशातच फडणवीसांसोबत त्यांची खातेवाटपाबाबत सविस्तर चर्चा झाली आहे.

सध्या विधिमंडळाचं विशेष अधिवेशन सुरु आहे. आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. आज ८ आमदारांचा शपथविधी होणार आहे. हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर हे दोन दिवसापासून नवनिर्वाचित आमदारांना शपथ देत आहे.

Eknath shinde, Devendra Fadanvis
Maharashtra Special Assembly session : NCP : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, 'घड्याळ' चिन्हावर 17 डिसेंबरला सुप्रीम कोर्टात सुनावणी

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या 16 डिसेंबरला सुरु होणार आहे. मात्र त्या आधी मंत्रिमंडळातील अन्य मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. राजभवनावर हा शपथविधी होणार असल्याचे समजते. हा शपथविधी 11 डिसेंबरला होण्याची शक्यता आहे. फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात कुणाची वर्णी लागणार येत्या दोनदिवसात स्पष्ट होईल.

Eknath shinde, Devendra Fadanvis
Shahada Asalod Liquor Ban : महिलांनी करुन दाखवलं; बॅलेट पेपरवर झालेल्या मतदानात दारुची बाटली अखेर 'आडवी'

विधानसभेचा अध्यक्ष आज निवडणार आहेत. यासाठी राहुल नार्वेकरांनी अर्ज दाखल केला आहे. त्यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची या पदावर दुसऱ्यांदा निवड होईल, असे चित्र आहे.

काल (रविवार) दुपारी १२ वाजेपर्यंतच विधानसभा अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करण्याची मुदत होती. राहुल नार्वेकर यांचा एकमेव अर्ज आला आहे. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नार्वेकर हे पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्ष म्हणून जबाबदारी घेणार आहेत.

आज अधिवेशनाचा शेवटच्या दिवशी विधानसभा अध्यक्ष निवडीचा प्रस्ताव मांडला जाणार आहे. हा प्रस्ताव मांडल्यानंतर अध्यक्ष निवड झाल्याची घोषणा करण्यात येणार आहे. उदय सामंत, दिलीप वळसे पाटील, संजय कुटे आणि रवी राणा हे विधानसभा अध्यक्ष पदासाठी विश्वास ठराव मांडतील. यानंतर संयुक्त सभागृहात राज्यपालांचे अभिभाषण होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com