लोकसभा निवडणुकीत '45 पार'चा नारा देणाऱ्या महायुतीचं गाडं '17' जागांवर रखडलं. भाजपला 9, शिवसेना शिंदे गट 7 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला अवघी 1 जागा मिळाली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत महायुतीची पिछेहाट झाली. तर, महाविकास आघाडीला ( Mahavikas Aghadi ) घवघवीत यश मिळालं आहे.
सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटील यांच्या पाठिंब्यासह काँग्रेस 14, शिवसेना ठाकरे गट 9 आणि राष्ट्रवादीचा 8 जागांवर विजय झाला आहे. निवडणुकीत मुस्लिम समाज महाविकास आघाडीच्या पाठीमागे उभा राहिला. याचाच फटका महायुतीला ( Mahayuti ) बसला आहे. हीच गोष्ट लक्षात घेत अजितदादांच्या राष्ट्रवादीनं बेरजेचं राजकारण करण्यास सुरूवात केली आहे.
आगामी विधानसभेतील राजकीय गणितं लक्षात घेऊन पुढील महिन्यात होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीचे उमेदवार ठरणार आहेत. विधानपरिषद निवडणुकीत अजितदादांच्या राष्ट्रवादीला दोन जागा मिळू शकतात. त्याच पार्श्वभूमीवर अजितदादांचा ( Ajit Pawar ) पक्ष विदर्भातून एक मुस्लिम उमेदवार देण्याची शक्यता आहे.
बुलढाण्यातील राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नाझेर काझी यांचं नाव आघाडीवर आहे. त्याअनुषंगानं सोमवारी ( 24 जून ) उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेटायला बोलावलं असल्याची माहिती नाझेर काझी यांनी दिली आहे.
अजित पवारांचे विश्वासू अशी काझी यांची ओळख आहे. ते दहा वर्षांपासून बुलढाणा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. काझी ज्या मतदारसंघात राहतात तिथे राष्ट्रवादीचे प्राबल्य आहे. तर, तेथून डॉ. राजेंद्र शिंगणे आमदार आहेत.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीतील निकालानंतर अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या अल्पसंख्याक विभागाची बैठक झाली होती. या बैठकीत अल्पसंख्याक समाजाचा गमावलेला विश्वास पुन्हा मिळवण्यासाठी काय करता येईल, याबाबत चर्चा झाली होती. यात नेत्यांनी पक्षश्रेष्ठींना काही गोष्टी सुचवल्या होत्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.