CM Eknath Shinde : विधानभवनात मोठी खळबळ; मुख्यमंत्र्यांना भेटायला आलेल्या महिलेने कापली हाताची नस !

Maharashtra Legislature Session 2024 : राज्य मंत्रिमंडळाचे अधिवेशनाच्या काळात वरिष्ठ अधिकारी, संबधित खात्याचे मंत्री हजर असल्याने आपले प्रश्न, अडचणी घेऊन त्यांची थेट भेट घेण्याचा प्रयत्न नागरिकांकडून केला जातो. यासाठी अधिवेशन काळात विविध जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढलेली असते.
Women Met Eknath Shinde
Women Met Eknath ShindeSarkarnama

Mumbai News : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्याचा हट्ट करत एका महिलेने विधानभवनाच्या बाहेर चक्क आपली नस कापली. मंगळवारी दुपारी अचानकपणे घडलेल्या या प्रकारामुळे विधानभवन परिसरात एकच खळबळ उडाली होती. घटनेचे गांर्भीय लक्षात घेत पोलिसांनी तातडीने या महिलेला ताब्यात घेत तिला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले आहे.

राज्य मंत्रिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सध्या मुंबईत सुरु आहे. या अधिवेशनामध्ये विविध प्रश्नांवर जोरदार चर्चा केल्या जात आहेत. राज्य सरकारचे हे अखेरचे अधिवेशन असल्याने लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये अडकलेला अर्थसंकल्प देखील या अधिवेशनामध्ये सत्ताधारी असलेल्या शिंदे-फडणवीस-पवार सरकारने मांडला आहे. आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवत या अर्थसंकल्पात अनेक योजना देखील प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना देखील या अर्थसंकल्पात नव्याने सुरु करण्याची घोषणा करण्यात आली असून त्यासाठी आवश्यक तो निधी देखील प्रस्तावित करण्यात आलेला आहे.

Women Met Eknath Shinde
Mukhyamantri Ladki Bahin Yojana : बहुचर्चित 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेत दोन मोठे बदल, आता 'या' महिलांनाही मिळणार लाभ!

अधिवेशन सुरु असल्याने संबधित खात्याचे अधिकारी, मंत्री तसेच त्या विभागांचे सचिव येथे उपस्थित असतात. त्यामुळे आपल्या अडचणी, प्रश्न, समस्या घेऊन मोठ्या प्रमाणात नागरिक अधिवेशनाच्या ठिकाणी येत असतात. सुरक्षिततेच्या कारणास्तव त्यांना अधिवेशनाच्या स्थळापासून काही अंतरावरच अडविले जाते. त्यांचे निवेदन घेत संबधित अधिकाऱ्यांपर्यंत पोहचविण्याचे आश्वासन दिले जाते.

आपले प्रश्न, अडचणी सुटण्यासाठी संबधित मंत्र्यांना भेटण्याचा हट्ट अनेकदा नागरिकांकडून केला जातो. यापूर्वी देखील अधिवेशनाच्या ठिकाणी मंत्र्यांनी भेट न दिल्याने नाराज झालेल्या व्यक्तींनी विष पिऊन, अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केल्याचे काही प्रकार घडले आहेत. त्यामुळे अधिवेशन काळात हे प्रकार घडू नये, यासाठी आवश्यक ती खबरदारी प्रशासनाकडून घेतली जाते. मोठ्या प्रमाणात पोलिस (Police) बंदोबस्त येथे ठेवला जातो.

Women Met Eknath Shinde
Uddhav Thackeray : साडेसहा तास चक्क उद्धव ठाकरे विधानभवनात कारण काय?

मंगळवारी विधानभवनाच्या बाहेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना भेटण्यासाठी एक महिला आली होती. सुरक्षिततेच्या कारणाने पोलिसांनी तिला अडविले. मुख्यमंत्री शिंदे यांना भेटण्याचा हट्ट या महिलेने धरला होता. सोसायटी आणि घरामधील अडचणीबाबत मुख्यमंत्र्यांना भेटायचे आहे, असे ही महिला म्हणत होती. मात्र सुरक्षा यंत्रणेने तिला आतमध्ये न सोडल्याने चिडलेल्या महिलेने ब्लेडने आपल्या हाताची नस कापून घेतली.

या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने या महिलेला ताब्यात घेत तिला उपचारांसाठी जी.टी. रुग्णालयात दाखल केले. या महिलेचे नाव काय, ती कोठून आली, याचा तपास आता पोलिसांनी सुरु केला आहे. तिला मुख्यमंत्र्यांनाच का भेटायचे होते, याची माहिती पोलिसांनी गोळा करण्यास सुरू केली आहे. या महिलेची चौकशी देखील पोलिसांकडून केली जाणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com