Sunil Shelke: माशी कुठं शिंकली? बारणेचं मताधिक्य का घटलं?; शेळके म्हणाले, 'दिवसा धनुष्यबाण अन् रात्री मशाल...'

Maval Lok Sabha 2024 Analysis Sunil Shelke answers Shrirang Barne Allegations about Ajip Pawar NCP: महायुतीचा धर्म पाळला नाही आणि काही ठिकाणी माझं काम केलं नाही. या कार्यकर्त्यांची यादी मी अजितदादांकडे दिली असल्याचे निकालापूर्वी बारणे यांनी सांगितले.
Sunil Shelke
Sunil ShelkeSarkarnama
Published on
Updated on

Sunil Shelke on Srirang Barne: अजित पवारांच्या राष्ट्रवादीने माझा 100 टक्के प्रचार केला नाही, असा दावा श्रीरंग बारणे यांनी निकालापूर्वी केला. त्याला अजित पवार गटातील आमदार सुनील शेळके यांनी बारणेंच्या (Srirang Barne) दाव्यावर पलटवार केला आहे. बारणे यांचा लीड का कमी झाला, याचे कारण अजित पवार गटाचे नेते, आमदार सुनिल शेळकेंनी (Sunil Shelke)सांगितले.

राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांनी सर्व कार्यकर्त्यांना माझं काम करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यांच्या सूचनेनंतर आमदारांनी,पदाधिकाऱ्यांनी माझं काम केलं. मात्र राष्ट्रवादीचा जो खालचा कार्यकर्ता आहे, त्याने महायुतीचा धर्म पाळला नाही आणि काही ठिकाणी माझं काम केलं नाही. या कार्यकर्त्यांची यादी मी अजितदादांकडे दिली असल्याचे निकालापूर्वी बारणे यांनी सांगितले.

अजितदादांच्या कार्यकर्त्यांनी माझा प्रचार केला नाही, हा बारणेंचा दावा शेळकेंनी खोडून काढला. विधानसभेपर्यंत महायुती टिकेल, अशी प्रार्थना आज ही देवाकडे करताय का? मावळ विधानसभेत मताधिक्य घटलं, नेमकी माशी कुठं शिंकली? दिवसा धनुष्यबाण आणि रात्री मशाल करणारे नेमके कोण? यावर शेळकेंनी खुलासा केला.

"महायुतीचे नवनिर्वाचित खासदार श्रीरंग बारणेंबाबत मावळ विधानसभेत नाराजीचा सूर होता. बारणेंचे मताधिक्य घटण्यामागे हे एक प्रमुख कारण होतं," असा गौप्यस्फोट सुनील शेळके यांनी केला आहे.

Sunil Shelke
Maharashtra Lok Sabha 2024 Result Analysis: बाळ्यामामा, प्रतिभाताई, बजरंग बाप्पा ठरले लईच ताकदवान; 7 जण जायंट किलर

महायुतीतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे तिसऱ्यांदा रिंगणात होते. त्यांची हॅट्रिक चुकवण्यासाठी महाविकास आघाडीतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजोग वाघेरे-पाटील यांनी दंड थोपटले होते.

मावळ मतदारसंघात श्रीरंग बारणेंच्या विजयाची हॅटट्रीक झाली असून 96 हजारांचं मताधिक्य घेऊन ते मावळमधून तिसऱ्यांदा शिवसेनेच्या तिकिटावर खासदार बनले आहेत.

मावळ मतदारसंघात पुण्याजवळील सांगवी-दापोडीपासून मुंबईजवळच्या घारापुरी लेण्यांपर्यंतचे क्षेत्राचा समावेश आहे. या मतदारसंघाची निर्मिती २००९ मध्ये झाली, तेव्हा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व होते. मात्र, पक्षातील अंतर्गत कुरघोड्या आणि गावकी-भावकीच्या राजकारणामुळे तिन्ही वेळा राष्ट्रवादीला शिवसेनेकडून पराभव पत्करावा लागला.

शिवसेना (एकनाथ शिंदे) गटाच्या संसदेतील गटनेतेपदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांची तर मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांची प्रतोद म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दिल्लीत झालेल्या पक्षाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com