भिवंडी - 48.89 टक्के
धुळे - 48.81 टक्के
दिंडोरी - 57.06 टक्के
कल्याण - 41.70 टक्के
उत्तर मुंबई - 46.91 टक्के
मुंबई उत्तर मध्य - 47.32 टक्के
मुंबई उत्तर पूर्व - 48.67 टक्के
मुंबई उत्तर पश्चिम - 49.79 टक्के
दक्षिण मुंबई - 44.22 टक्के
मुंबई दक्षिण मध्य - 48.26 टक्के
नाशिक - 51.16 टक्के
पालघर - 54.32 टक्के
ठाणे - 45.38 टक्के
बिहार - 52.35 टक्के
जम्मू-काश्मीर - 54.21 टक्के
झारखंड - 61.90 टक्के
लडाख - 67.75 टक्के
महाराष्ट्र - 48.66 टक्के
ओडिसा - 60.55 टक्के
उत्तर प्रदेश - 55.80 टक्के
पश्चिम बंगाल - 73.00 टक्के
भिवंडी - 37.63 टक्के
धुळे - 39.97 टक्के
दिंडोरी - 45.95 टक्के
कल्याण - 32.43 टक्के
उत्तर मुंबई - 39.33 टक्के
मुंबई उत्तर मध्य - 37.66 टक्के
मुंबई उत्तर पूर्व - 39.15 टक्के
मुंबई उत्तर पश्चिम - 39.91 टक्के
दक्षिण मुंबई - 36.64 टक्के
मुंबई दक्षिण मध्य - 38.77 टक्के
नाशिक - 39.41 टक्के
पालघर - 42.48 टक्के
ठाणे - 36.07 टक्के
बिहार - 45.33 टक्के
जम्मू-काश्मीर - 44.90 टक्के
झारखंड - 53.90 टक्के
लडाख - 61.26 टक्के
महाराष्ट्र - 38.77 टक्के
ओडिसा - 48.95 टक्के
उत्तर प्रदेश - 47.55 टक्के
पश्चिम बंगाल - 62.72 टक्के
बिहार - 34.62 टक्के
जम्मू-काश्मीर - 34.79 टक्के
झारखंड -41.89 टक्के
लडाख - 51.02 टक्के
महाराष्ट्र - 27.78 टक्के
ओडिसा - 35.31 टक्के
उत्तर प्रदेश - 39.55 टक्के
पश्चिम बंगाल - 48.41 टक्के
भिवंडी - 27.43 टक्के
धुळे - 28.73 टक्के
दिंडोरी - 33.25 टक्के
कल्याण - 22.52 टक्के
उत्तर मुंबई - 26.78 टक्के
मुंबई उत्तर मध्य - 28.05 टक्के
मुंबई उत्तर पूर्व - 28.82 टक्के
मुंबई उत्तर पश्चिम - 28.41 टक्के
दक्षिण मुंबई - 24.46 टक्के
मुंबई दक्षिण मध्य - 27.21 टक्के
नाशिक - 28.81 टक्के
पालघर - 31.06 टक्के
ठाणे - 26.05 टक्के
माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि अर्जुन तेंडुलकर यांनी पाली हिलमध्ये मतदानाचा अधिकार बजावला आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी आज दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघाअंतर्गत मलबार हिल येथील राजभवन भवन क्लब मतदान केंद्रामध्ये जाऊन मतदानाचा हक्क बजावला. यावेळी राज्यपालांच्या पत्नी रामबाई बैस यांनी देखील मतदान केले.
भिवंडी - 14.79 टक्के
धुळे - 17.38 टक्के
दिंडोरी - 19.50 टक्के
कल्याण - 11.46 टक्के
उत्तर मुंबई - 14.71 टक्के
मुंबई उत्तर मध्य - 15.73 टक्के
मुंबई उत्तर पूर्व - 17.01 टक्के
मुंबई उत्तर पश्चिम - 17.53 टक्के
दक्षिण मुंबई - 12.75 टक्के
मुंबई दक्षिण मध्य - 16.69 टक्के
नाशिक - 16.30 टक्के
पालघर - 18.60 टक्के
ठाणे - 14.86 टक्के
बिहार - 21.11 टक्के
जम्मू-काश्मीर - 21.37 टक्के
झारखंड -26.18 टक्के
लडाख - 27.87 टक्के
महाराष्ट्र - 15.93 टक्के
ओडिसा - 21.07 टक्के
उत्तर प्रदेश - 27.76 टक्के
पश्चिम बंगाल - 32.70 टक्के
शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे आणि तेजस ठाकरे यांनी रांगेत उभे राहून मतदानाचा हक्क बजावला आहे. "जनता जुमलाबाजीला कंटाळली आहे. लोकशाहीला वाचवण्यासाठी मतदार मतदान करतील," अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कुटुंबीयांसह मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी पत्नी शर्मिला ठाकरे, अमित ठाकरे यांनीही मतदान केलं आहे. "उन्हाळ्याचे दिवस आहेत. संध्याकाळी पाचवाजेपर्यंत किती मतदान होते, ते पाहू. जास्तीत जास्त मुंबईकर मतदान करतील, अशी अपेक्षा आहे. तेच घिसं पिटं वाक्य मतदानाचा हक्क बजावा. तरूण मोठ्या प्रमाणात मतदानासाठी येतील. ज्यांच्या अपेक्षा संपल्यात त्यांच्याकडून मतदानाची अपेक्षा करू नका," असं राज ठाकरेंनी म्हटलं.
राज ठाकरेंनी पक्षासाठी मेहनत केली असती, तर पक्षा वाढला असता. पैसे वाटणाऱ्या कार्यकर्त्यांना संरक्षण दिलं जातंय. भाजपला जिंकण्याची खात्री नाही, असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.
खासदार संजय राऊत यांनी कुटुंबीयांसह मतदान केलं आहे. यावेळी आमदार सुनिल राऊत, आई, पत्नी, मुलींनीही मतदानाचा हक्क बजावला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी पत्नी लता शिंदे, श्रीकांत शिंदे, सूनबाई वृषाळी शिंदे यांनीही मतदान केलं आहे.
"बोगस मतदार आणण्याची आम्हाला गरज नाही. बोगस मतदान होणार असं म्हणणाऱ्यांनी हत्यारं टाकली," असं प्रत्युत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार राजन विचारे यांना दिलं आहे.
भिवंडी - 4.86 टक्के
धुळे - 6.92 टक्के
दिंडोरी - 6.40 टक्के
कल्याण - 5.39 टक्के
उत्तर मुंबई - 6.19 टक्के
मुंबई उत्तर मध्य - 6.01 टक्के
मुंबई उत्तर पूर्व - 6.83 टक्के
मुंबई उत्तर पश्चिम - 6.87 टक्के
दक्षिण मुंबई - 5.34 टक्के
मुंबई दक्षिण मध्य - 7.79 टक्के
नाशिक - 6.45 टक्के
पालघर - 7.95 टक्के
ठाणे - 5.67 टक्के
बिहार - 8.86 टक्के
जम्मू-काश्मीर - 7.63 टक्के
झारखंड -11.68 टक्के
लडाख - 10.51 टक्के
महाराष्ट्र - 6.33 टक्के
ओडिसा - 6.87 टक्के
उत्तर प्रदेश - 12.89 टक्के
पश्चिम बंगाल - 15.35 टक्के
शिवसेना शिंदे गटाचे कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी कल्याण उंबर्डे येथील मतदार केंद्रावर सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावलाव. "लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला आज सकाळपासून उत्साहात सुरुवात झाली असून देशाच्या विकासासाठी मतदार हे महायुतीच्याच बाजूने उभे राहतील," असा ठाम विश्वास कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी व्यक्त केला
मुंबई उत्तर-पश्चिमचे उमेदवार रवींद्र वायकर आणि अमोल कीर्तिकर यांनी मतदानाचा हक्क बजवला आहे.
मुंबई उत्तर मध्य मुंबईत वर्षा गायकवाड विरुद्ध उज्ज्वल निकम यांच्यात लढाई होत आहे. उज्ज्वल निकम यांनी मतदानाचा हक्क बजवला आहे. तर वर्षा गायकवाड यांनी आईसोबत मतदान केलं आहे.
मुलुंड पूर्व निलम नगर गव्हाणपाडा येथील शाळेत किरीट सोमय्या यांनी पत्नी मेधा सोमय्या, मुलगा नील सोमय्या आणि सूनबाई दिव्या यांच्यासोबत मतदानाचा हक्क बजवला. 2014, 2019 प्रमाणेच 2024 मध्ये नागरिकांमध्ये उत्साह आहे. "लोकांच्या चेहऱ्यावर एकच भाव आहे, फिर एक बार मोदी सरकार. सगळ्यांनी मतदान करावे," असं आवाहन किरीट सोमय्यांनी केलं आहे.
रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी मुंबई पत्नी आणि मुलीसह मतदान केलं आहे.
मुंबई दक्षिण मध्यचे शिंदे गटाचे उमेदावर राहुल शेवाळे यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी सौ कामिनी राहुल शेवाळे, मुलगा स्वयम शेवाळे उपस्थित होते. विशेष म्हणजे स्वयम शेवाळे याचे हे पहिले मतदान आहे.
1977 पासून राम विलास पासवान यांनी हाजिपूर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत आले आहेत. त्यामुळे हे नाते वेगळं आहे. जे प्रेम माझ्या वडिलांना मिळालं, तेच मलाही मिळेल, असा मला विश्वास आहे. वडिलांनी केलेली कामे पुढे घेऊन जाण्याचा संकल्प मी केला आहे, असं विधान लोकजन शक्ती पक्षाचे ( राम विलास पासवान ) नेते चिराग पासवान यांनी केलं आहे.
मुंबई उत्तरचे उमेदवार पीयूष गोयल यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यांच्याविरोधात काँग्रेसनं भूषण पाटील यांना उमेदवारी दिली आहे.
धुळे लोकसभेचे भाजपचे उमेदवार सुभाष भामरे यांनी सहकुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी 'अबकी बार 400 पार' असा नारा देत त्यांनी पुन्हा आपला विजय होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे,
डोंबिवलीतील मंजुनाथ विद्यालय येथील मतदान केंद्रावरील एक ईव्हीएम मशीन बंद पडले आहे.त्यामुळे अर्धा पाऊण तासापासून नागरिक रांगेत
नाशिकमधील शिंदे गटाचे उमेदावर हेमंत गोडसे आणि शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. वाजे यांनी सिन्नर तालुक्यातील भाटवाडी गावात सहकुटुंब मतदान केलं आहे.
उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील एच. के. कॉलेज येथे ईव्हीएम मशीन अद्यापही सुरू झालेलं नाही. बुथ क्रमांक 56 वरील मशीन बंद असल्यानं मतदारांना रांगेतच उभं राहणं भाग पडलं आहे.
ठाण्यातील नौपाडा मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन बंद पडले आहे. त्यामुळे अनेक मतदार मतदानाशिवाय परतले आहे. येथे शिंदे गटाचे उमेदवार नरेश म्हस्के दाखल झाले असून त्यांच्याकडून पाहणी करण्यात आली आहे.
मुंबई दक्षिणचे उमेदवार अरविंद सावंत यांनी मतदान केलं आहे. त्यांची लढत शिंदे गटाच्या उमेदवार यामिनी जाधव यांच्याशी होत आहे. हॅट्ट्रिक होणार असल्याचा विश्वास अरविंद सावंत यांनी व्यक्त केला आहे.
उद्योगपती अनिल अंबानी यांनी मुंबईत मतदानाचा हक्क बजावला आहे.
अभिनेता कुमार यानं मुंबईत मतदान केलं आहे.
बसपाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी लखनौ येथे मतदानाचा हक्क बजावला आहे. सर्वांनी मतदान करण्यासाठी बाहेर पडावं, असं आवाहन मायावती यांनी केलं आहे.
पाच पाखडी परिसरात हजार ते दीड हजार बोगस मतदान होईल, राजन विचारे यांचा आरोप
मुंबई ईशान्यचे भाजपचे उमेदवार मिहीर कोटेचा यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
नाशिकमध्ये अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यासह शांतीगिरी महाराज यांनी ईव्हीएम मशिनला हार घातला आहे.
मुंबई दक्षिणच्या उमेदवार यामिनी जाधव यांनी पती यशवंत जाधव यांच्यासह मतदानाचा हक्क बजवला आहे.
मुंबई उत्तर :
पीयूष गोयल (भाजप) विरुद्ध काँग्रेसचे भूषण पाटील
मुंबई उत्तर मध्य :
उज्ज्वल निकम (भाजप) विरुद्ध काँग्रेसच्या वर्षा गायकवाड
मुंबई दक्षिण :
अरविंद सावंत (शिवसेना ठाकरे गट ) विरुद्ध यामिनी जाधव (शिवसेना शिंदे गट)
मुंबई दक्षिण मध्य :
राहुल शेवाळे (शिवसेना शिंदे गट) विरुद्ध अनिल देसाई (शिवसेना ठाकरे गट)
मुंबई उत्तर-पश्चिम :
रवींद्र वायकर (शिवसेना शिंदे गट) विरुद्ध अमोल कीर्तिकर (शिवसेना ठाकरे गट)
मुंबई ईशान्य :
संजय दिना पाटील (शिवसेना ठाकरे गट) विरुद्ध भाजपचे उमेदवार मिहीर कोटेचा
कल्याण :
वैशाली दरेकर-राणे (शिवसेना ठाकरे गट) विरुद्ध डॉ.श्रीकांत शिंदे (शिवसेना शिंदे गट)
ठाणे :
राजन बाबुराव विचारे (शिवसेना ठाकरे ) विरुद्ध नरेश म्हस्के (शिवसेना शिंदे गट)
भिवंडी :
कपिल मोरेश्वर पाटील (भाजप) विरुद्ध सुरेश म्हात्रे (राष्ट्रवादी शरद पवार गट)
पालघर :
हेमंत सावरा (भाजप) विरुद्ध भारती कामडी (शिवसेना ठाकरे गट)
धुळे :
भामरे सुभाष रामराव (भाजप) विरुद्ध शोभा दिनेश (काँग्रेस)
दिंडोरी :
डॉ.भारती प्रवीण पवार विरुद्ध भास्कर मुरलीधर भगरे (शरद गट)
नाशिक :
हेमंत तुकाराम गोडसे (शिवसेना शिंदे गट) विरुद्ध राजाभाऊ वाजे (शिवसेना ठाकरे गट)
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या फेरीत उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, ओडिशा, झारखंड आणि जम्मू काश्मीर आणि लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशांमधील एकूण 49 जागांसाठी आज ( 20 मे ) मतदान पार पडत आहे. या टप्प्यात काँग्रेस नेते राहुल गांधी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांचे भवितव्य पणाला लागले आहे.
दुसरीकडे पाचव्या टप्प्यात राज्यातील 13 जागांवर आज मतदान पार पडत आहे. त्यामध्ये धुळे, दिंडोई, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई उत्तर-पूर्व, मुंबई उत्तर-मध्य, मुंबई दक्षिण-मध्य आणि मुंबई दक्षिण या मतदारसंघाचा समावेश आहे.
13 जागांपैकी सात जागांवर भाजपचे, सहा जागांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. महाविकास आघाडी मध्ये काँग्रेस तीन, राष्ट्रवादी ( शरदचंद्र पवार ) दोन आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना उर्वरित नऊ जागांवर रिंगणात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.