Nashik Political News: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज लोकसभेसाठी (Maharashtra Loksabha Election 2024) पक्षाच्या १७ उमेदवारांची यादी जाहीर केली. यामध्ये काही मतदारसंघांबाबत नेत्यांमध्ये चर्चा सुरू होती. त्याबाबत एकमत होण्याआधीच यादी जाहीर केली, असा दावा आघाडीच्या (Mahavikas Aghadi) वरिष्ठ नेत्यांनी केला आहे.
राऊतांनी परस्पर यादी जाहीर केल्याने आघाडीत वादाची ठिणगी पडली आहे. त्यामुळे आघाडीतील वरिष्ठ नेत्यांनी ठाकरे गटाच्या या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली. याबाबत वरिष्ठ नेत्यांची आज बैठक आहे. यात त्याचे पडसाद उमटू शकतात.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
शिवसेनेच्या उमेदवारांच्या यादीबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील नाराज आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार, जयंत पाटील आणि उद्धव ठाकरे यांच्यात आज लोकसभेच्या जागावाटपाबाबत अंतिम चर्चा होणार होती.
आज दुपारी ही बैठक अपेक्षित आहे. ही बैठक होण्याआधीच उमेदवार जाहीर करायला नको होते. उमेदवारांची यादी परस्पर सामंजस्याने निश्चित केल्यावर जाहीर करणे अपेक्षित होते, असा दावा या नेत्यांनी केला आहे.
नाशिकसह अन्य काही मतदारसंघांच्या जागावाटपाबाबत तसेच उमेदवारांविषयी आज चर्चा होणार होती. याबाबत यापूर्वी झालेल्या बैठकांमध्ये सहकारी पक्षाने विविध प्रस्ताव दिले होते. त्यामुळे संबंधित मतदारसंघांत एकोप्याचे वातावरण राहण्यासाठी वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीनंतर ही नावे जाहीर केली असती, तर त्याचे अधिक स्वागत झाले असते. संजय राऊत यांनी या बैठकीची वाट न पाहताच यादी जाहीर केल्याने नाराजीचे खापर राऊत यांच्यावर फुटण्याची शक्यता आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने लोकसभेसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. विद्यमान खासदार अरविंद सावंत, संजय जाधव, ओमराजे निंबाळकर, विनायक राऊत यांच्यासह एकूण १७ जणांची नावे जाहीर केली आहेत. चार ते पाच जागांची घोषणा दोन दिवसांत जाहीर करणार, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले.
Edited by: Mangesh Mahale
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.