Ambadas Danve News: खैरेंना उमेदवारी जाहीर, दानवे म्हणाले, "आम्हाला हट्ट करण्याचा अधिकार..."

Maharashtra Lok Sabha Election 2024: शिंदे गटाकडून दर चार पाच दिवसांनी मला फोन येतात, हे मी नाकारत नाही. मात्र माझ्याकडून होकार नाही. ते सर्व माझे जुने सहकारी आहेत.
chandrakant khaire, Ambadas Danve
chandrakant khaire, Ambadas Danvesarkarnama
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाच्या संभाजीनगरमधील जागेवरून वाद (Lok Sabha Election 2024) पाहायला मिळत होता. माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire)आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांच्यातील उमेदवारीसाठी सुरू असलेला वादावर आज पडदा पडला. खैरे यांना उमेदवारी जाहीर करून दानवेंच्या पत्ता कट करण्यात आला आहे. खैरेंची उमेदवारी जाहीर केल्यानंतर दानवेंची प्रतिक्रिया समोर आली आहे.

छत्रपती संभाजीनगर लोकसभेसाठी मी इच्छुक होतो. 2014, 2019, आणि आताही इच्छा होती. इच्छा असणे चूक नाही, मात्र मला विरोधी पक्षनेते पदाची महत्त्वाची जबाबदारी दिली आहे. आम्हाला हट्ट करण्याचा अधिकार आहे. पण निर्णय घेण्याचा अधिकार पक्ष प्रमुखाचा आहे, सर्वांची मते जाणून घेऊन ही यादी केली आहे. ही प्रभावी यादी आहे, असे दानवे म्हणाले. "व्यक्तिगत हितापेक्षा संघटनेचे हित महत्त्वाचे आहे. पक्ष प्रमुख आणि पक्ष जी जबाबदारी देतील ती सर्व जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणार," असे दानवे म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अंबादास दानवे शिंदे गटात जाणार अशी चर्चा काही दिवसांपासून आहे. यावर दानवे म्हणाले, "शिंदे गटाकडून दर चार पाच दिवसांनी मला फोन येतात, हे मी नाकारत नाही. मात्र माझ्याकडून होकार नाही. ते सर्व माझे जुने सहकारी आहेत, त्यांनी इच्छा व्यक्त केली. मी सोबत असावा असे त्यांना वाटते. मात्र मी उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे. माझी लढाई ही गद्दारांसोबत आहे, मी गद्दारी करणार नाही,"

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने लोकसभेसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली आहेत. विद्यमान खासदार अरविंद सावंत, संजय जाधव, ओमराजे निंबाळकर, विनायक राऊत यांच्यासह एकूण १७ जणांची नावे जाहीर केली आहेत. चार ते पाच जागांची घोषणा दोन दिवसांत जाहीर करणार, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले.

chandrakant khaire, Ambadas Danve
Uddhav Thackeray News: काँग्रेसच्या नाकावर टिच्चून ठाकरेंनी टाकला डबल केसरी डाव; विशाल पाटलांनी दिल्ली गाठली...

ठाकरे गटाचे हे आहेत उमेदवार

१) बुलडाणा -प्रा. नरेंद्र खेडेकर

२) यवतमाळ - वाशीम -संजय देशमुख

३) मावळ- संजोग वाघेरे पाटील

४) सांगली- चंद्रहार पाटील

५) हिंगोली- नागेश पाटील आष्टीकर

६) संभाजीनगर- चंद्रकांत खैरे

७) धाराशिव- ओमराजे निंबाळकर

८) शिर्डी- भाऊसाहेब वाघचौरे

९) नाशिक- राजाभाऊ वाजे

१०) रायगड- अनंत गिते

११) सिंधुदुर्ग - रत्नागिरी- विनायक राऊत

१२) ठाणे- राजन विचारे

१३) मुंबई - ईशान्य- संजय दिना पाटील

१४) मुंबई - दक्षिण- अरविंद सावंत

१५) मुंबई - वायव्य- अमोल कीर्तिकर

१६) परभणी- संजय जाधव

१७) दक्षिण मध्य- अनिल देसाई

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com