Mahadev Jankar: दिल्लीची वाट ठाकरेंच्या बंडू जाधव यांनी रोखली; महादेव जानकर विधान भवनात..

Maharashtra Monsoon Session 2024: लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर महादेव जानकर आज विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विधान भवनात दिसले.जानकरांच्या या एंट्रीने अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या.
Mahadev Jankar
Mahadev JankarSarkarnama

Mumbai News: नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत परभणी मतदारसंघात राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर (Mahadev Jankar) हे महायुतीच्या पाठिंब्यावर मैदानात उतरले होते. मात्र शिवसेना ठाकरे गटाचे विद्यमान खासदार संजय उर्फ बंडू जाधव (Sanjay Jadhav) यांनी त्यांचा दणदणीत पराभव करत दिल्लीची वाट रोखली.

लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर महादेव जानकर आज विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विधान भवनात दिसले. जानकरांच्या या एंट्रीने अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या.

लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर महादेव जानकर यांनी माढा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी निवडणूक लढवत असलेल्या बारामती मतदारसंघातून लढण्याची तयारी सुरू केली होती.

गेल्या लोकसभा निवडणुकीत महादेव जानकर यांनी बारामतीमध्ये लक्षवेधी मते घेत आपली ताकद सिद्ध केली होती. त्यामुळे जानकारांची उमेदवारी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासाठी डोकेदुखी ठरेल हे लक्षात आल्यामुळे बारामती किंवा माढ्यामध्ये त्यांचा उपद्रवू नको म्हणून अजित पवारांनी त्यांना परभणी लोकसभेची जागा देऊ केली.

Mahadev Jankar
Sanjay Raut: उद्धव ठाकरे हेच मविआचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा; राऊतांच्या विधानामुळे आघाडीत बिघाडी?

राष्ट्रवादीच्या कोट्यातून ही जागा महादेव जानकर यांच्यासाठी सोडण्यात आली. त्यामुळे माढा, बारामती ऐवजी जानकारांनी थेट परभणी गाठली आणि लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली.

दरम्यान शिवसेना ठाकरे गटाकडून दोन टर्म खासदार राहिलेले संजय उर्फ बंडू जाधव यांना तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर झाली. राज्यात शिवसेना पक्ष फुटल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिल्यामुळे जाधव यांना शिवसेनेच्या पारंपरिक हिंदुत्ववादी मतदारांची सहानुभूती होती.

याशिवाय महादेव जानकर यांच्या परभणी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याच्या निर्णयामुळे या लढतीला मराठा विरुद्ध ओबीसी असे स्वरूप प्राप्त झाले. परभणी लोकसभा मतदारसंघातील ओबीसी मतदारांची लक्षणे संख्या डोळ्यासमोर ठेवूनच महादेव जानकर यांनी परभणीतून लढण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जाते.

महादेव जानकर यांना निवडून आणण्यासाठी महायुतीतील विशेषत: भाजपने मोठी ताकद लावली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः परभणीत जानकारांच्या प्रचारासाठी सभा घेतली. दरम्यान निवडणूक प्रचारात महादेव जानकर यांना मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून परभणी लोकसभा मतदारसंघात अनेक ठिकाणी समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागले होते.

तर दुसरीकडे शिवसेनेच्या संजय जाधव यांना मराठा समाजाचा पाठिंबा मिळू लागला. काँग्रेस- राष्ट्रवादीशी आघाडी असल्यामुळे जाधव यांना जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मुस्लिम मतांचीही मदत झाली.

Mahadev Jankar
Sanjay Singh: आपचे खासदार संजय सिंह तब्बल वर्षभरानंतर संसदेत जाणार; उपराष्ट्रपतींचे मानले आभार!

बाहेरचा विरुद्ध स्थानिक उमेदवार असाही प्रचार महाविकास आघाडीकडून केला गेला. जानकर हे महायुतीचे उमेदवार असले तरी ते बाहेरचे असल्यामुळे जिल्ह्यातील स्थानिक भाजप लोकप्रतिनिधी, नेते आणि पदाधिकाऱ्यांची त्यांना म्हणावी तशी मदत झाली नसल्याचे बोलले जाते. एकूणच या सगळ्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाच्या बंडू जाधव यांनी महादेव जानकर यांचा तब्बल एक लाख छत्तीस हजार मतांनी पराभव करत त्यांची दिल्लीची वाट रोखली.

परभणीत दारुण पराभव झाल्यानंतर पुढे काय? असा प्रश्न महादेव जानकर आणि त्यांच्या समर्थकांपुढे होता. राज्यातील महायुती सरकारचे शेवटचे अधिवेशन असलेल्या विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महादेव जानकर यांची विधानभवनातील एन्ट्री सगळ्यांसाठीच लक्षवेधी ठरली.

महाराष्ट्रातून विधान परिषदेवर पाठवण्यात येणाऱ्या जागांसाठी सत्ताधारी महायुती उमेदवारांची चाचपणी करत असताना जानकर थेट विधान भवनात आल्यामुळे परभणीत पराभव झाल्यानंतर ते विधान परिषदेच्या माध्यमातून पुन्हा सभागृहात दिसतात का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Edited by: Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com