Maharashtra Mantralaya: स्मार्टफोन नाही, प्रवेश नाही! मंत्रालयातील गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी मोठा निर्णय

No entry into Mantralaya without smartphone: मंत्रालयातील गर्दी रोखण्यासाठी सरकारने केलेल्या अनेक प्रयत्नांना अपयश येत असल्यामुळे आता गर्दी रोखण्यासाठी आणखी एक नवा उपाय करण्यात येत आहे.
new entry rules for Maharashtra ministry
new entry rules for Maharashtra ministrySarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 12 Aug : मंत्रालयातील गर्दी रोखण्यासाठी सरकारने केलेल्या अनेक प्रयत्नांना अपयश येत असल्यामुळे आता गर्दी रोखण्यासाठी आणखी एक नवा उपाय करण्यात येत आहे.

तो म्हणजे मंत्रालयात यापुढे स्मार्टफोन असलेल्यांनाच प्रवेश मिळणार आहे. तसंच केवळ डीजी ॲपद्वारे नोंदणी केलेल्या व्यक्तींनाच मंत्रालयात प्रवेश मिळणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मंत्रालयातील प्रवेश दुरापास्त होण्याची शक्यता आहे.

मंत्रालयातील गर्दी नियंत्रित करण्यासाठी अधिकारी, कर्मचारी आणि पत्रकारांसाठी चेहरा पडताळणी प्रणालीद्वारेच प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतरही मंत्रालयात येणाऱ्या अभ्यागतांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवता येत नव्हते.

new entry rules for Maharashtra ministry
Uday Samant : उदय सामंतांनी भाजपला पुन्हा डिवचलं, एकनाथ शिंदेंमुळेच महाराष्ट्रात महायुतीची सत्ता!

दुपारनंतर मंत्रालया बाहेरच्या प्रवेश खिडक्यांवर ओळखपत्राच्या आधारे प्रवेशपत्र मिळवणाऱ्या लोकांची गर्दी कमी होत नव्हती. शिवाय रोजचे पास घेऊन मंत्रालयात येणाऱ्यांची मोठी रांग देखील प्रवेशद्वाराजवळ लागायची.

new entry rules for Maharashtra ministry
Pune Police : रमीचा नाद अन् थेट तुरूंगात! पुणे पोलिसांची मोठी कारवाई, जुगार अड्ड्यावर छापेमारी करत भाजप पदाधिकाऱ्याला ठोकल्या बेड्या

त्यामुळे आता प्रवेशासाठीचे पास न देण्याचा निर्णय घेण्यात आला असून स्वातंत्र्यदिनापासून म्हणजेच 15 ऑगस्टपासून ‘डीजीप्रवेश’ ॲपवर नोंदणी केलेल्यांनाच मंत्रालयात प्रवेश मिळणार आहे. त्यामुळे खिडकीवर प्रवेशसाठीचा पास देणं बंद होणार आहे. त्यामुळे ज्यांच्याजवळ स्मार्टफोन नसेल त्यांना मंत्रालयात नो एन्ट्री असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com