Rashtrawadi Congress Party: दोन जुलैरोजी महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला. अजित पवारांसह राष्ट्रवादीतील नऊ आमदार शिंदे-फडणवीस यांच्यासोबत सत्तेत सहभागी झाले. त्यानंतर राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत. या दोन्ही गटाची आज मुंबईत बैठक आहे. दोन्ही गट बैठकांच्या माध्यमातून शक्तीप्रदर्शन करणार आहेत. या दोन्ही बैठकीसाठी राष्ट्रवादीचे आमदार मुंबईकडे रवाना झाले आहे.
या बैठकीनंतर शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे नेमके किती आमदार आहेत याचं चित्र आज स्पष्ट होणार आहे. अजित पवार यांनी अंधारात ठेवून काही आमदारांच्या सह्या घेतल्या असल्याचा, दिशाभूल केल्याचा दावा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. त्यामुळे कोणासोबत किती संख्याबळ याचा नेमका खुलासा आजच्या बैठकांमध्ये होण्याची शक्यता आहे.
‘आम्हीच खरे राष्ट्रवादी’ असा दावा करणारे काका-पुतणे (शरद पवार व अजित पवार) बुधवारी मुंबईत स्वतंत्र बैठकांद्वारे शक्तिप्रदर्शन करीत आहेत. भाजपला पाठिंबा देण्याबाबत ४० आमदारांच्या सह्यांचे आपल्याकडे पत्र आहे. त्यामुळे पक्ष व चिन्ह आमच्याकडेच असा दावा अजित पवार गटाने केला आहे. तर अनेक आमदार आमच्याकडे परत येत असल्याचा दाव शरद पवार गटाने केला आहे.
यशवंतराव चव्हाण सभागृहात शरद पवार गटाची तर भुजबळ नॉलेज सिटीत अजित पवार गटाची बैठक आयोजित केली आहे. त्यासाठी दोन्ही बाजूंच्या प्रतोदांनी व्हीपही बजावला आहे अनेक आमदार काल (मंगळवारी) रात्रीच मुंबईत आले आहेत. अखेरपर्यंत पळवापळवीचे प्रयत्न सुरू असल्याने त्यांना हॉटेलमध्ये नजरकैदेत ठेवले असल्याची माहिती आहे.
राष्ट्रावादी कॉंग्रेस मध्ये अजित पवारांनी सकाळी 11 वाजता कार्यकर्त्यांची, आमदारांची बैठक बोलावली आहे. तर शरद पवार यांनी दुपारी 1 वाजता वाय बी चव्हाण सेंटर वर बैठक बोलावली आहे. दोन्ही गटाकडून आपल्यासोबत आमदार असल्याचा दावा केला जात आहे. काल रात्री ANI शी बोलताना प्रफुल्ल पटेल यांनी 40 पेक्षा अधिक आमदार अजित पवारांच्या पाठीशी असल्याचे सांगितले आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी पक्षांतर्गत 50 पेक्षा अधिक आमदारांना भाजपा सोबत जायचं होतं तशा हालचाली, चर्चा यापूर्वी झाल्या होत्या या वृत्ताला दुजोरा दिला आहे. पण जयंत पाटील यांनीच असे पत्र शरद पवारांना त्रास होईल म्हणून न दिल्याचा गौप्यस्फोट केला आहे.
शिवसेना कुणाची या प्रश्नावर वर्षभर कायदेशीर काथ्याकूट सुरू होता. कोर्टात हा वाद संपला, तोच आता राष्ट्रवादी कुणाची हा प्रश्न उपस्थित होत आहे.
(Edited By : Mangesh Mahale)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.