Shivsena Minister Uday Samant News, Shivsena News in Marathi, Eknath Shinde News, Political Crisis in Maharashtra
Shivsena Minister Uday Samant News, Shivsena News in Marathi, Eknath Shinde News, Political Crisis in Maharashtra sarkarnama

..नाहीतर मी गुवाहाटीला गेलो असतो : उदय सामंत

Uday Samant News : सामंत हे मुंबईतून बाहेर पडल्यानंतर ते गुवाहाटीला गेले का, असा प्रश्न विचारण्यात येत आहे.

मुंबई : मागील तीन दिवस रत्नागिरीचे शिवसेनेचे आमदार व राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत हे मातोश्री व वर्षा बंगल्यावर ठाण मांडून होते. काल सामंत हे मुंबईतून बाहेर पडल्यामुळे ते नेमके कुठ गेलं, याविषयी चर्चांना उधाण आलं आहे. सामंत हे मुंबईतून बाहेर पडल्यानंतर ते गुवाहाटीला गेले का, असा प्रश्न विचारण्यात येत आहे, याबाबत उदय सामंत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. (Eknath Shinde news update)

एका प्रश्नाला उत्तर देताना सामंत म्हणाले,"मी शिवसेनेत आहे.नाहीतर मी गुवाहाटीला गेलो असतो. मी आता गुवाहाटीतून नाही तर पाली (रत्नागिरी) येथून बोलत आहे," "कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले किंवा महाविकास आघाडीतील नेते काय बोलत आहेत, यावर चर्चा करण्यापेक्षा आम्ही सगळे एकसंघपणे राहणे ही सगळ्याची जबाबदारी आहे," ते माध्यमांशी बोलत होते.(Shivsena News in Marathi)

एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर चौथ्या दिवशी सामंत रत्नागिरीच्या दौर्‍यावर आले आहेत. कोकणकन्या एक्स्प्रेसने ते रत्नागिरी रेल्वे स्थानकावर उतरून थेट पाली येथील निवासस्थानी गेले आहे.या ठिकाणी ते शिवसेना पदाधिकार्‍यांच्या भेटीगाठी घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीनंतर सेनेतील ४० हून अधिक आमदार यात सहभागी झाले असले तरी उदय सामंत हे शिवसेनेशी एकनिष्ठ आहेत. या घटनेनंतर प्रथमच ते रत्नागिरीत परतत आहेत. मात्र, या दौर्‍यात एकही कार्यक्रम नसून ते पाली येथील निवासस्थानी थांबणार आहेत. (Uday Samant News)

Shivsena Minister Uday Samant News, Shivsena News in Marathi, Eknath Shinde News, Political Crisis in Maharashtra
शिवसेनेच्या बंडखोर आमदारांबाबत मुख्यमंत्र्यांचे अजब विधान

सामंतांनी आपण मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख यांच्या पाठीशी ठाम असल्याचे सांगितले.शिवसेना पक्षप्रमुखांनी आतापर्यंत जी जबाबदारी दिली व यापुढेही देतील ती आपण पार पाडणार असल्याचेही सामंत यांनी सांगितले.

मागच्या तीन दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra political situation) घमासान सुरू आहे. एकनाथ शिंदे (eknath shinde in guwahati) यांनी शिवसेनेसोबत बंडखोरीकरून 40 च्यावर आमदार गुवाहाटी (guwahati) येथे घेऊन गेले. आम्हाला राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत (ncp and congress) काम करायच नाही महाविकास आघाडीतून (mahavikas aghadi) बाहेर पडा असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. शिंदे यांच्या गोटात हळूहळू शिवसेनेचे एक-एक आमदार सामिल होत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com