केलेली मदत लोक कसे विसरतात: आदेश बांदेकर-शरद पोंक्षेंमध्ये जुंपली

Shivsena| CM Uddhav Thackeray| राज्यात सुरु असलेल्या सत्तासंघर्षावरुन शिवसेना नेते आदेश बांदेकर आणि अभिनेता शरद पोंक्षे यांच्यातही एक नवा वाद उफळला आहे.
Maharashtra Politics
Maharashtra Politics
Published on
Updated on

मुंबई : राज्यातील राजकीय घडामोडीचे वेगवेगळे पडसाद उमटल्याचे पाहायला मिळत आहेत. राज्यात सुरु असलेल्या सत्तासंघर्षावरुन शिवसेना (Shivsena) नेते आदेश बांदेकर आणि अभिनेता शरद पोंक्षे यांच्यातही एक नवा वाद उफळला आहे. शरद पोंक्षे यांनी शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे आभार मानणारी पोस्ट करत शिंदेंचा उल्लेख त्यांनी 'मोठा भाऊ' असा केला. या पोस्टनंतरच अभिनेते आदेश बांदेकर (Adesh Bandekar) यांनी त्यांचा एक जुना व्हिडिओ शेअर करत "हा शरद पोंक्षे तुच ना' असा सवाल केला आहे.

- काय आहे प्रकरण?

शरद पोंक्षे यांनी ट्विट करत 'कर्करोगाशी लढताना मोठ्या भावासारखे शिंदेसाहेब माझ्या पाठीशी खंबीरपणाने उभे राहिले, असे म्हटले. तसेच शरद पोंक्षे यांनी त्यांचं 'दुसरं वादळ' या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीतील एक फोटो पोस्ट करत, 'कॅन्सरच्या काळात माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले एकनाथ शिंदे साहेब, त्यांचा आणि माझा एक फोटोही छापलाय यात! त्यांनी केलेल्या मदतीबद्दल यात सविस्तर लिहिलंय'. असंही म्हटलं आहे.

Maharashtra Politics
युतीसाठी ठाकरेंच्या निकटवर्तीयाने फडणवीसांना 21 तारखेलाच केला होता फोन?

पण, शरद पोंक्षेंनी केलेल्या या पोस्टमध्ये आदेश बांदेकर किंवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा उल्लेख नव्हता. ही बाब बांदेकर यांना काहीशी खटकल्याने त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली. त्यावर शरद पोंक्षे यांनी ट्विटरच्याच माध्यमातून दिलं. त्यामुळे सध्या सोशल मिडीयावर बांदेकर आणि पोंक्षे यांच्यातील मतभेद समोर आले आहेत.

- आदेश बांदेकर यांच्या भावना

यावर बोलताना आदेश बांदेकर यांनी साम'ला दिलेल्या मुलाखतीत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.'' शरद पोंक्षे कर्करोगाशी लढत असताना उद्धव ठाकरे यांनी रुग्णालयापासून त्यांच्या उपचारासाठी पाठपुरावा केला. कर्करोग माणसाचे खच्चीकरण करत असतो, अशावेळी तुम्ही त्याच्याशी बोलत राहा, असही सांगितलं. हे सर्व करत असताना त्यांनी शिवसेना म्हणून सर्वांना मदत करण्याचे आदेश दिले. ज्यांनी ज्यांना पोंक्षेंना मदत केली ती शिवसेना म्हणून केली. प्रत्येक गोष्टींची एक क्रोनॉलॉजी असते ना, मग त्याचा विसर कसा पडतो, असा सवाल आदेश बांदेकर यांनी केला.

Maharashtra Politics
‘आले शंभर, गेले शंभर, उद्धव ठाकरे एक नंबर’

''मी मित्र आहे मित्राने केलेलं कधीही बोलायचं नसतं. शिवसेनेने अनेक कलावंतांना मदत केली. उद्धव ठाकरेंनी तातडीने फोन करुन पाठपुरावा केला, मग अशा पोस्ट करताना लोक अशा गोष्टी कशा काय विसरतात, असंही आदेश बांदेकर यांनी विचारला. २०१९ मध्ये त्यांनी जी मुलाखत दिली ती वस्तुस्थिती होती. तीच मी पोस्ट केली. जर पुस्तकात लिहीलं होतं,तर तुम्हाला पोस्ट टाकायचीच काय गरज होती, ज्या नेतृत्त्वाने तुमच्यासाठी इतक केलं त्यांचा साधा उल्लेखही त्यात नसावा, यांच वाईट वाटतं.

ज्यावेळी शरद पोंक्षेंच्या आजाराबद्दल उद्धव ठाकरेंना कळलं तेव्हा त्यांनी किती पाठपुरावा केला. बॉम्बे हॉस्पिटलच्या डॉक्टरांना कॉल करुन त्यांच्यावर विशेष लक्ष द्यायला सांगितले होते. मग २०१९ नंतर २०२२ येतं आणि त्या प्राधान्यात फरक कसा होतो, एवढाच माझा प्रश्न आहे, अस आदेश बांदेकर यांनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com