

Mumbai News: 'राजकारणात आलो नसतो तर वकील झालो असतो," असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज सकाळ माध्यम समूहाला विशेष मुलाखत दिली. यावेळी त्यांनी राज्यात सुरू असलेल्या विविध विकासकामे आणि राजकीय विषयांवर भाष्य केले.
आमदार असताना फडणवीस यांच्याकडे फाईलींच्या गठ्ठा असायचा. विधीमंडळ अधिवेशनाला जात असताना त्यांच्याकडे संदर्भासाठी अनेक पुस्तके असतात, सध्याचे राजकारणी एवढा अभ्यास करीत नाही, यावर फडणवीस म्हणाले, "मी वकील आहेच. पण मला वकीलीची प्रॅक्टीस करायची होती, मला वकीलीची आखणी अभ्यास करायचा होता. पण ते शक्य झाले नाही, आता जनतेची वकीली करीत आहे, असे फडणवीस म्हणाले.
"मला पहिल्यापासून कुठल्याही विषयाबाबत खोलात जाण्याची सवय आहे. सभागृहात मी जेव्हा बोलायतो, तेव्हा माझ्याकडे त्या विषयाबाबत दहा-बारा पुस्तके संदर्भासाठी असतात. विधीमंडळात एखादा विषय आला तर मी त्यासाठी अनेक पुस्तकातून संदर्भ घेत असतो. वरवर न बोलता सुधारात्मक पद्धतीने काय करता याकडे माझा कल असतो," असे फडणवीस यांनी सांगितले.
राष्ट्रकुल संसद मंडळाने मला माझ्या पहिल्याच टर्ममुळे उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार दिला होता, मी तेव्हा सभागृहात नवीनच होतो. तेव्हा ज्येष्ठ आमदार, मंत्री मला जास्त बोलण्यासाठी वेळ द्यायचे, ते आवर्जून उपस्थित राहायचे. माझ्या भाषणाला किमंत द्यायचे, असे फडणवीस म्हणाले. "मी राजकीय बोलत नाही, मी विचारपूवर्क बोलतो, हे माझ्या सहकाऱ्यांना, मंत्र्यांनी माहीत होते, असे फडणवीस म्हणाले.
राज्यावर सध्या ९.३२ लाख कोटी रुपयांचे कर्ज असून व्याजापोटी बजेटमधील ११ टक्के रक्कम खर्च होत असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली आहे. मात्र, हे कर्ज राज्याच्या ४५ लाख कोटींच्या विशाल अर्थव्यवस्थेच्या तुलनेत चिंताजनक नसल्याचा दावा फडणवीसांनी केला आहे. कर्जाचा आकडा ॲब्सोल्यूट नंबरमध्ये न बघता तो अर्थव्यवस्थेच्या आकाराशी पडताळून पाहावा, असे ते म्हणाले.
"आम्ही प्रॉडक्टिव्ह कर्ज घेत असून त्यातून राज्याची अर्थव्यवस्था विस्तारत आहे असे सांगत त्यांनी विरोधकांच्या आरोपांना उत्तर दिले आहे. स्मार्ट आणि एफिशिएंट खर्चावर भर दिल्यास राज्याची प्रगती होईल आणि कर्जाची परतफेड करण्याची क्षमता निर्माण होईल," असा विश्वास फडणवीस यांनी या वेळी व्यक्त केला.
२०१२-१३ मध्ये ४ लाख कोटींचे कर्ज असताना अर्थव्यवस्था १२ लाख कोटींची होती. याकडे फडणवीसांनी लक्ष वेधले. विकसनशील अर्थव्यवस्थेत महसूल तूट असतेच, पण विकासासाठी कर्ज घेणे अपरिहार्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मला 2 डिसेंबरपर्यंत युती टीकवायची आहे, असे विधान नुकतेच केले आहे. यावर फडणवीस यांना विचारले असता ते म्हणाले, आम्हाला युती टीकवायची आहे. आमची ताकद वाढली म्हणून आम्ही मित्रपक्षांना सोडून देणार नाही, असा शब्द फडणवीस यांनी यावेळी दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.