Mumbai News: लोकसभा निवडणुकीत भाजपच्या पडझडीची जबाबदारी स्वीकारलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी निकालाचे 'पोस्टमार्टम' केले आणि हरवून भाजप कसा जिंकला आहे, हे आकड्यानिशी पटवून दिली.
निवडणूक, त्यातील प्रचाराचे मुद्दे, मतांचे प्रमाण, त्यातील सत्ताधारी-विरोधकांचे स्थान हेही फडणवीसांनी पटवून दिले. निवडणुकीआधी विरोधी ठाकरे-पवारांना ठोशास ठोशाच्या भाषेत उत्तर देऊन हिशेब चुकते करणाऱ्या फडणवीसांनी मीडियापुढे ठाकरे-पवारांबाबत 'ब्र'ही काढला नाही.
फोडीफोडीचे राजकीय, ठाकरे-पवारांना हल्ले चढविण्यापासून विरोधी नेत्यांच्या विशेषतः ठाकरेंकडच्या नेत्यांच्या चौकशांवर-चौकशा लावण्याच्या मोदी सरकारच्या खेळ्यांमुळेच भाजपवर निवडणुकीत अशी वेळ ओढवल्याचे कारण सांगितले जात आहे.
लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यापासून भाजपचे नेते कोणी आता ठाकरे किंवा पवारांवर बोलत नसल्याचे दिसते विरोधकांवर नेहमीच आक्रमकपणे चाल करणे परवडत नसल्याचे हेरून भाजप नेतृत्व बॅकफूटवर गेल्याचेही दिसत आहे.
महाराष्ट्रात कागदावर प्रचंड ताकद असूनही भाजपला जेमतेम 9 जागा मिळाल्याने प्रदेश संघटनेत बदल होण्याचे संकेत दिले गेले. तेवढ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीच आता सरकारमधून म्हणजे, उपमुख्यमंत्रीपदावरून मोकळे करण्याची अपेक्षा पक्ष नेतृत्वाकडे मांडली.
जो काही पराभव झाला आहे. त्याची जबाबदारी माझी आहे. ती स्वीकारतो, अशी कबुलीही फडणवीसांनी दिली. मला पुढच्या विधानसभा निवडणुकीसाठी सरकारमधून मोकळे करावे, अशी विनंती पक्ष नेतृत्त्वाला करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
मी हार मानणारा नाही. मी ताकदीने लढणार असल्याचे सांगून विरोधकांशी दोन हात करीत राहणार असल्याचाही निर्धार त्यांनी केला. निकालानंतर काही तासांतच फडणवीसांनी ही भूमिका मांडल्याने राजकीय वर्तुळ हादरले आहे.
'मला सरकारमधून मोकळे करण्याची विनंती दिल्लीतील नेतृत्वाकडे असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले. त्यामुळे भाजपच्या वर्तुळात उलटसुलट चर्चा होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपचे सर्वाधिक 28 उमेदवार दिले होते. निवडणुकीआधी सर्वच राजकीय पक्षांतील नेत्यांना फोडून, फडणवीसांनी अनेक नेत्यांना भाजपमध्ये आणले. तरीही, ठाकरे-पवारांना प्रचंड सहानुभूती असल्याचे चित्र दिसून आले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.