Maharashtra Politics News:
Maharashtra Politics News:Sarkarnama

Devendra Fadnavis: फडणवीसांची कबुली; ठाकरेंना ओळखू शकलो नाही, त्यांना १९९५ पासूनच मुख्यमंत्री...

Maharashtra Politics News: नारायण राणे यांना मुख्यमंत्री होण्यापासून रोखले. खरे तर राजकीय महत्वाकांक्षा बाळगण्यात काही गैर नाही, पण त्यामागचा हेतू काय हे महत्वाचे.उध्दवजींना जनहितासाठी पद नको होते तर त्यांना सत्ता " लाभासाठी " हवी होती,"

Mumbai News: उद्धव ठाकरेंना १९९५ पासूनच मुख्यमंत्री व्हायची इच्छा होती अन् हे पद त्यांना लोकहितासाठी नको होते असे खळबळजनक विधान ज्येष्ठ भाजपनेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले आहे. उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) तर भाजपसमवेत असायचे. त्यांना ओळखू शकलो नाही, अशी कबुली फडणवीस यांनी दिली.

'सकाळ'ला दिलेल्या मुलाखतीत फडणवीसांनी राज्यातील सत्तांतराबाबत अनेक गुपीतं उलगडले. "उध्दवजी व्यक्तीगत टिकाटिप्पणी करणारी जी भाषा वापरतात ती कीव करण्यासारखी आहे .मात्र महाराष्ट्र अशा विखारी प्रचाराला नाकारणारा प्रदेश असून या भूमीत विकास या एकमेव मुद्द्यावर मतदान होईल, अन् ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील महायुतीलाच असेल असा विश्वासही फडणवीसांनी व्यक्त केला.

उध्दव ठाकरे तर भाजपसमवेत असायचे, त्यांना तु्म्ही ओळखू शकला नाहीत? यावर फडणवीस म्हणाले, "तसे खरे झाले.ते आम्हाला वंदनीय असलेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे पुत्र होते.काही गोष्टी लक्षात आल्या तरी बोलायचो नाही आम्ही.अगदी खरे सांगायचे तर उध्दवजींना १९९५ पासूनच मुख्यमंत्रीपदाची स्वप्ने पडू लागली होती. १९९९ च्या निवडणूक निकालानंतर त्यांचे नाव पुढे येईना, मुख्यमंत्रीपदासाठी म्हणून त्यांनी अपक्ष आमदारांच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष केले. नारायण राणे यांना मुख्यमंत्री होण्यापासून रोखले. खरे तर राजकीय महत्वाकांक्षा बाळगण्यात काही गैर नाही, पण त्यामागचा हेतू काय हे महत्वाचे.उध्दवजींना जनहितासाठी पद नको होते तर त्यांना सत्ता " लाभासाठी " हवी होती,"

Maharashtra Politics News:
Maharashtra Politics: अजितदादांना महायुतीत का घेतलं? फडणवीसांनी सांगितलं कारण...

माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात कोस्टल रोड एमएमआरडीए किंवा सिडकोकडून बांधला जावा. वेगाने काम होईल असे मी म्हणालो होतो.पण उध्दवजी म्हणाले महापालिका करेल. आमचे एकत्र सरकार होते. त्यांना दुखावयाचे कशाला, महापालिकाही उत्तम काम करेल म्हणून मी होकार दिला. उद्देश वेगळेच होते त्यामागचे. स्वत:च्या अखत्यारीत त्यांना काम हवे होते. कशासाठी हे उघड आहे.जनता जाणते सगळे, असा आरोप फडणवीसांना ठाकरेंवर केला.

एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत फूट पाडल्यानंतर उध्दव ठाकरेंबद्दल राज्यातील जनतेच्या मनात प्रचंड सहानुभूती असल्याचे बोलले जाते, ठाकरेंबाबत असलेली सहानुभूती मोदीपर्वाला मागे टाकतेय असेही म्हटलं जाते, याबाबत फडवणीस म्हणाले, "उध्दव ठाकरेंनी काय केलेय आजवर ? सहानुभूती ही काम करणाऱ्याबाबत असते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शरद पवारसाहेब स्वत:च सांगतात की त्यांनी पाच चिन्हांवर निवडणुका लढवल्या आहेत.म्हणजे पाचवेळा संधी साधत काही नवे करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. यश मिळत नाही हे लक्षात येताच त्यांनी आणखी नवा प्रयत्न केला. निकाल अपेक्षेप्रमाणे लागत नाहीत हे कळताच आता त्यांनी विलीनीकरणाची चर्चा सुरु केल. कायम असेच असते त्यांचे, "असा टोला फडणवीसांनी पवारांना लगावला. "आम्ही वैचारिक निष्ठांना सर्वाधिक महत्व देतो.उध्दवजी कॉंग्रेससमवेत जातील असे वाटले नाही कधीच," असे फडणवीस म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com