Maharashtra Politics: अजितदादांना महायुतीत का घेतलं? फडणवीसांनी सांगितलं कारण...

Devendra Fadnavis on Ajit Pawar: बारामतीच्या लढाईत दादांना कुटुंबाने एकटे पाडले.ते अभिमन्यूसारखे लढले.आमच्या लोकांना भाजपला त्या लढयाचे अप्रूप वाटतेय. अजितदादा आमच्यासोबत त्यांच्या आमदारांना घेऊन आले. त्यांच्यावरच्या आरोपांमुळे ते आले नाही.त्यांचे दोषसिध्द झाले नाहीत.
Maharashtra Politics
Maharashtra PoliticsSarkarnama

अजितदादांना समवेत घ्यायची काय गरज होती ? त्याचा काय फायदा झाला ? त्यांना भाजपने अद्यापही स्वीकारलेले नाही, अजितदादांवर (Ajit Pawar) मोठे आरोप होते. त्यांना का सांभाळले गेले? याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांनी ‘सकाळ’शी सविस्तर बातचीत केली. 'सकाळ'च्या ज्येष्ठ पत्रकार, राजकीय विश्लेषक मृणालिनी नानिवडेकर यांनी ही मुलाखत घेतली.

Maharashtra Politics
Rahul Shewale: मोठी बातमी: शेवाळेंवर आरोप करणारी तरुणी तासाभरातच पोलिस ठाण्यात हजर राहणार; तपासाची चक्रे फिरणार

शिंदे-फडणवीस सरकारमध्ये (Maharashtra Politics) अजित पवार यांनी एन्ट्री केल्यानंतर राज्यातील राजकीय समीकरणं बदलली. 'अजितदादांना समवेत घ्यायची काय गरज होती ? त्यांचा काय फायदा झाला? अजितदादांना भाजपने स्वीकारलेले नाही अजून, या प्रश्नावर फडणवीस म्हणाले, "२०१३ मध्ये मी पिसिंग पिसिंग म्हटले प्रदेशाध्यक्ष म्हणून.आरोपांची चौकशी झाली की खरे कळेल. बाकी म्हणाल तर बारामतीच्या लढाईत दादांना कुटुंबाने एकटे पाडले.ते अभिमन्यूसारखे लढले.आमच्या लोकांना भाजपला त्या लढयाचे अप्रूप वाटतेय. मोदीजींच्या विकासकामाला पाठिंबा देण्यासाठी अजितदादा आमच्यासोबत त्यांच्या आमदारांना घेऊन आले. त्यांच्यावरच्या आरोपांमुळे ते आले नाही.त्यांचे दोषसिध्द झाले नाहीत,"

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अन्य पक्षांचे सरकार होते तेव्हा का त्यांना पाठीशी घातले? ते आधीच्या सरकारचा भाग होते अन् आता विरोधात बसलेल्यांनी तरी काय चौकशीची मागणी केली ? करावी .सत्य बाहेर आणण्याचा आग्रह धरावा . जबाबदारी आम्हा राजकारण्यांची अन् तुम्हा माध्यमांचीही.संयुक्त जबाबदारी म्हणूयात.आमची जबाबदारी मोठी हे खरे ती आम्ही पार पाडायला हवीच . माध्यमांनी जर दररोज विशिष्ट निश्चित वेळेला गरळ ओकणारी विधाने दाखवणे सुरु ठेवले तर तसाच नरेटिव्ह जनतेच्या मनात तयार होत नाही. जनता त्यांच्याशी संबंधित विषयात रस घेत असते. समाजाच्या प्रगतीसाठी व्यक्तीगत व्देषाचा, कथित अन्यायाचा संबंध नसतो, असे फडणवीसांनी स्पष्ट केले.

लोकसभेच्या जागावाटपातही महायुतीत अन्याय झाल्याचे दिसते. यावर फडणवीस म्हणाले, "३० जागा लढाव्यात, असा आग्रह होता आमचा. प्रयत्नही केला तसा पण शिवसेनेलाही इच्छा होती जास्त जागा लढण्याची हरकत नाही.आमच्याही जागा वाढल्याच. आता प्रत्येक उमेदवाराला आम्ही मदत करतो आहोत,"

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com