Maharashtra Politics : "त्या गोष्टी मी स्वीकारत नाही पण..."; CM फडणवीसांकडून शरद पवारांचं तोंडभरून कौतुक, नेमकं काय म्हणाले?

Devendra Fadnavis praises Sharad Pawar : राजकारणात कोणीही कोणाचा कायमचा शत्रू नसतो आणि कोणी कायमचा मित्रही नसतो, असं म्हटलं जात. कधीकाळी एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक असलेल्या पक्षांच्या युती आणि आघाड्यांमुळे राजकारणात काहीही शक्य आहे याची खात्री जनतेला झाली आहे.
Sharad Pawar, Devendra Fadnavis
Sharad Pawar, Devendra Fadnavis sarkarmnama
Published on
Updated on

Mumbai News, 29 May : राजकारणात कोणीही कोणाचा कायमचा शत्रू नसतो आणि कोणी कायमचा मित्रही नसतो, असं म्हटलं जात. याचा प्रत्येय महाराष्ट्रातील जनतेला 2019 पासूनच राजकारण पाहता सातत्याने येत आहे.

कधीकाळी एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक असलेल्या पक्षांच्या युती आणि आघाड्यांमुळे राजकारणात काहीही शक्य आहे याची खात्री जनतेला झाली आहे. आताही राज्याच्या राजकारणात अशीच काहीशी परिस्थिती आहे.

कारण महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेली शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीतील अजित पवारांच्या राष्ट्रवादीत विलिन होणार असल्याच्या चर्चा सतत सुरू असतात. अशातच आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत बोलताना त्यांचे राजकीय विरोधक असलेल्या शरद पवारांचे तोंडभरून कौतुक केलं आहे.

आपल्याला शरद पवारांच्या यांच्याबद्दल अनेक गोष्टी आवडतात ते या वयातही काम करतात हे कौतुकास्पद आहे असं फडणवीसांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता विविध चर्चांना उधाण आलं आहे.

Sharad Pawar, Devendra Fadnavis
Vaishnavi Hagawane News : 'जो त्या वकिलाच्या चार कानशि‍लात लावेल, त्याचा सत्कार करणार, '; शरद पवारांच्या महिला नेत्याचं मोठं विधान

या मुलाखतीत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शरद पवार यांबद्दलच्या अनेक गोष्टी मला आवडतात. त्यांच्या काही गोष्टी अशाही आहेत की ज्या मी स्वीकारत नाही. मात्र, मी त्यांच्या सातत्याचे कौतुक करतो.

Sharad Pawar, Devendra Fadnavis
Ahilyanagar Shrigonda NCP : मोठी राजकीय उलथापालथ; ठाकरे अन् पवारांची साथ सोडली, जगताप-नागवडे अजितदादांकडे गेले

कारण या वयातही ते काम करतात. ते जिंकले, हरले किंवा परिस्थिती कशीही सातत्याने काम करतात." तर फडणवीसांनी केलेल्या वक्तव्यावर आता महाविकास आघाडीतील नेते काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com