काय झाडी, काय डोंगार, काय हाटील; मिम्सनंतर आता गाणंही

Shahaji Bapu Patil Latest news| सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांचा, काय झाडी, काय डोंगार, काय हाटील.. डायलॉगने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
काय झाडी, काय डोंगार, काय हाटील; मिम्सनंतर आता गाणंही

मुंबई : शिवसेनेतील बंडखोर आमदारांच्या गोटात सामील झालेले सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांच्या डायलॉगने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. या डायलॉगचे अनेक मीम्स सध्या सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत आहेत. विशेष म्हणजे या डायलॉगवर आता गाणंही बनवलं गेलं आहे. मराठी यूट्यूबर शंतनू पोळे (Shantanu Pole) या तरुणाने शहाजीबापू पाटील यांच्या डायलॉगला संगीत देत हे गाणं तयार केलं असून सोशल मीडियावर चांगलचं व्हायरल होत आहे.

शिवसेना आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर सुरवातीचे काही दिवस शहाजी बापू पाटील यांच्याशी संपर्क झाला नाही. त्यानंतर एका कार्यकर्त्यानं आमदार साहेबांना फोन केला आणि कुठे आहात असे विचारले. त्यावर त्यांनी उत्तर देत आम्ही आता गुवाहाटीत असल्याचं सांगत 'काय झाडी, काय डोंगार, काय हाटील ...येकदम ओक्केमध्ये आहे"' असं गावरान भाषेत वर्णन केलं. त्यांनी केलेल्या वर्णनाने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. सोशल मिडीयवर त्यांचे डोंगरावरचे फोटो 'काय झाडी, काय डोंगार' या कॅप्शनसह सोशल मीडियावर अपलोड करत अनेक मीम्सही बनवले आहेत.

काय झाडी, काय डोंगार, काय हाटील; मिम्सनंतर आता गाणंही
राष्ट्रवादीमुळेच शिवसेनेचं नुकसान; शिवसेनेच्या माजी आमदारानेही आळवला सूर

शहाजी बापू पाटील यांच्या या डायलॉगची सोशल मिडीयवरही जोरदार चर्चा रंगली आहे. मीम्सचाही नुसता पाऊस पडत आहे. त्यांच्या या डायलॉगमुळे कधी नव्हे ती शाहजी बापू पाटलांची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. शहाजी बापू पाटील हे सोलापूरातील सांगोला मतदारसंघाचे आमदार आहेत. सोशल मीडियावर सध्या 'काय झाडी, काय डोंगार'ची चांगलीच हवा आहे. मीम्सचा नुसता पाऊस पडला आहे. त्यामुळे कधी नव्हे ती शाहजी बापू पाटलांची सोशल मीडियावर चर्चा आहे. बापू पाटील सांगोला मतदारसंघाचे आमदार आहेत.

कोण आहेत शहाजी बापू पाटील

विद्यार्थी दशेपासून ते काँग्रेसचे कार्यकर्ते होते. १९८५ मध्ये त्यांनी शेतकरी कामगार पक्षाचे नेते गणपतराव देशमुख यांच्याविरोधात निवडणूक लढवली. मात्र पाटलांचा पराभव झाला. पुढच्या विधानसभा निवडणुकीतही ते पराभूत झाले. १९९५ मध्ये शहाजी बापू पाटील यांनी अवघ्या १९२ मतांनी गणपतराव देशमुख यांचा पराभव केला.

काय झाडी, काय डोंगार, काय हाटील; मिम्सनंतर आता गाणंही
विरोधातील राष्ट्रवादीमुळेच पाणीटंचाई; सत्तेतून पायउतार होताच भाजपला लागला शोध

२०१९ मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांना विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या तिकीटावर पाटील विजयी झाले. गणपतराव देशमुख यांचे नातू अनिकेत देशमुख यांचा ७६८ मतांनी पराभव करत शहाजी पाटील विधानसभेत पोहोचले. १९९५ मध्येही अवघ्या १९२ मतांनी निवडून आले. गणपतराव देशमुख यांचा त्यांनी पराभव केला. मात्र त्यानंतर झालेल्या चार विधानसभा निवडणुकांमध्ये पाटलांचा पराभव झाला.

मात्र राज्यात शिवसेना -भाजप सरकार स्थापन न होता. शिवसेना,राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसचे महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. पण आज अडीच वर्षांनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदेंनी केलेल्या बंडामुळे अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली. शिवसेनेत उभी फूट पडली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गोटातीलही आमदार असलेले आमदार एक एक करुन शिंदे गटात सामील झाले. त्यामुळे हा संघर्ष आता कोर्टात पोहोचला आहे.त्यामुळे या सत्तासंघर्षात पुढे काय होतयं हे पाहण महत्त्वाचं ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com