राष्ट्रवादीमुळेच शिवसेनेचं नुकसान; शिवसेनेच्या माजी आमदारानेही आळवला सूर

Maharashtra Political crises| उद्धव ठाकरे यांच्या बाजूने असलेले आमदारही दिवसेंदिवस शिंदे गटात सामील होत आहेत.
Subhash Sabane| Shivsena
Subhash Sabane| Shivsena

मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा आज सातवा दिवस आहे. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर राज्यात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या बाजूने असलेले आमदारही दिवसेंदिवस शिंदे गटात सामील होत आहेत. त्यात आता विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी 16 बंडखोर आमदारांना अपात्रतेची नोटीस बजावली असल्याने हा संघर्ष आता कोर्टात पोहोचला आहे. (Maharashtra Political Crises)

अशातच शिवसेनेच्या माजी आमदारानेही मुख्यमंंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. छगन भुजबळांनी बाळासाहेबांना अटक केल्यावर विधानसभेत याविरोधात जाब विचारल्याबद्दल वर्षभर निलंबन झेललेल्या माजी शिवसेना आमदार सुभाष साबणे यांनी उद्धव यांना थेट सवाल केला आहे.

Subhash Sabane| Shivsena
श्रीमान केसरकर, आपण यांना ओळखता ना! गुलाबरावांचा व्हिडीओ ट्विट करत राऊतांनी डिवचलं

''उद्धव ठाकरे म्हणतात माझ्या आणि माझ्या कुटूंबाच्या विरोधात बोलणाऱ्या किरीट सोमया यांच्या मांडीला मांडी लावून मी कसं बसू, मग शिवसेनाप्रमुखांना अटक करून नेणाऱ्या छगन भुजबळ यांच्या मांडीला मांडी लावून बसताना, त्यांना घरी जेवायला बोलावताना आपल्याला काहीच वाटलं नाही का?' असा सवाल शिवसेनेचे माजी निलंबित आमदार सुभाष साबणे यांनी केला आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत अनैसर्गिक आघाडी करून आधी यवतमाळ जिल्ह्यात शिक्षक मतदारसंघात शिवसेनेच्या श्रीकांत देशपांडे यांच्या विरोधात अनिल देशमुख यांच्या मेव्हण्याला उमेदवारी देऊन त्यांचा पराभव करण्यात आला. पंढरपूरची पोटनिवडणुक लागली त्यातही शिवसेनेची जागा राष्ट्रवादीला सोडण्यात अली, देगलूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत पुन्हा तेच करण्यात आलं.

कोल्हापूर पोटनिवडणुकीत राजेश क्षिरसागर यांच्यासारखा कार्यकर्ता असतानाही ती जागा काँग्रेसला सोडण्यात आली. एकनाथ शिंदे यांच हे बंड नसून शिवसेनेच्या भल्यासाठी दिलेला लढा आहे. त्यामुळे सर्वसामान्य शिवसैनिकांनी भावनिक आवाहनाला न भुलता त्यांच्या लढ्याला जाहीर समर्थन द्यावं अशी मागणी त्यांनी केली असल्याचे सुभाष साबणे यांनी म्हटलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com