Sharad Pawar on Maharashtra Politics: शरद पवार गरजले; तरुणांना नाउमेद होऊ देणार नाही, नव्याने पक्षबांधणी करणार

आज गुरूपोर्णिमा असल्यानेच यशंवतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळापासून या लढाईला सुरुवात केली,
Sharad Pawar
Sharad Pawar Sarkarnama
Published on
Updated on

Sharad Pawar : "आमच्यातील काही सहकाऱ्यांनी वेगळी भूमिका घेतली. ज्यांनी वेगळी भूमिका घेतली, त्यांनी महाराष्ट्रात चांगली कामगिरीही केली. पण ज्या प्रवृत्तींशी आमचा संघर्ष आहे त्यांच्यासोबत गेल्याने त्यांच्यामुळे नव्या पिढीचा कार्यकर्ता नाउमेद होऊ नये, तो पुन्हा उमेदीने उभा राहावा, यासाठी आजपासून (3 जुलै) मी हा दौरा करत आहे. साताऱ्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले, साताऱ्यात आल्यापासून सकाळी गाडीत बसल्यापासून ठिकठिकाणी मोठ्या सख्येंने कार्यकर्ते उभे होते. त्यातल्या त्यात ७० ते ८० टक्के तरुण स्वागताला आणि पाठिंबा द्यायला उभे आहेत. हेच चित्र मी सगळीकडे पाहत आहे. आम्ही कष्ट केले, या तरुणांना योग्य दिशा दिली. माझी खात्री आहे, राष्ट्रवादी मजबूत करायला तरुण उभे राहतील, या दोन तीन महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रवादीसाठी अनुकूल चित्र तयार करण्याची भूमिका बजावता येईल, त्याची सुरुवात आजपासून झाली. आज गुरूपोर्णिमा असल्यानेच यशंवतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळापासून या लढाईला सुरुवात केली, असंही शरद पवार यांनी यावेळी सांगितलं.

Sharad Pawar
Ahmednagar Bank Election On Ajit Pawar ; गद्दारी करणाऱ्याला असा झटका देईन की १० पिढ्या विसरणार नाही; अजितदादांचा इशारा

या जिल्ह्यात जसे चित्र आहे त्याप्रमाणे महाराष्ट्रातील तरुणही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत करायला उभा राहिल, नव्या कार्यकर्त्यांना संधी दिली जाईल, तरुणांना नाउमेद होऊ देणार नाही, त्यासाठीच या मोहिमेची सुरुवात इथपासून सुरु केलाी आहे. भाजपकडून जातीय तेढ निर्माण केली जात आहे. (Maharashtra Politics) अमोल कोल्हे देवगिरी बंगल्यावर होते,माझी मुलगीही तिनदा तिथे गेली. म्हणजे ते काही चुकीचे नव्हते. ते काही परके नव्हते, अमोल कोल्हेंनी मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांची चूक नाही. त्यांच्यावर मी संशय घेणार नाही, असंही शरद पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं.

मला अशा प्रसंगांची सवय आहे. भूतकाळातही मी अशा प्रसंगांचा सामना केला आहे. पण कालच्या घटनेनंतर आज जेव्हा मी साताऱ्याला येत होतो. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) नेत्यांना हजारो शक्ती दिली, पाठिंबा दिला. अपेक्षा होती की त्यांनी महाराष्ट्रात संघटन मजबूत करावं. पण आज देशात भाजप समजा-समाजात जाती-धर्मात एक वातावरण तयार कऱण्याचा प्रयत्न केला जात आहे. या सर्वांशी संघर्ष करुन सामाजित ऐक्य आणि समता यासाठी प्रयत्न करावा, ही आमची अपेक्षा आहे.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com