Ahmednagar Bank Election On Ajit Pawar ; गद्दारी करणाऱ्याला असा झटका देईन की १० पिढ्या विसरणार नाही; अजितदादांचा इशारा

Ajit Pawar News : अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांची निवड झाली.
Ajit Pawar News
Ajit Pawar NewsSarkarnama
Published on: 
Updated on: 

Ahmednagar District Bank Election News : अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांची निवड झाली. बँकेच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) अर्ज दाखल केला होता. बहुमत असूनही त्यांचा एका मताने पराभव झाला. त्यामुळे हा पराभव विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे.

आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या कार्यक्रमासाठी अजित पवार अहमदनगरमध्ये आले होते. या कार्यक्रमात बोलताना पवार यांनी जिल्हा बॅंकेत आघाडीला मतदान न करणाऱ्या संचालकांना इशारा दिला. गद्दारी करणाऱ्याला झटका दिल्याशिवाय राहणार नाही, असे अजित पवार म्हणाले. गद्दारी करणाऱ्या अवलादी आपल्याकडे नकोत, असे त्यांनी स्पष्ट केले.

Ajit Pawar News
NCP Protest News: पुण्यातही 'आरे'सारखा मुद्दा पेटणार? झाडांच्या कत्तलीवरुन पालिकेविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

यावेळी अजित पवार म्हणाले, एक गोष्ट अलिकडच्या काळात फार चुकीची घडली आहे. अहमदनगर जिल्हा बॅंकेची अध्यक्षपदाची निवडणूक, त्यामध्ये काय घडले कसे घडले सगळे मला माहिती आहे. कोणी त्यामध्ये शेण खाल्ले हे मला चांगले माहित आहे. गद्दारी करणाऱ्याला असा झटका देणार आहे की १० पिढ्या त्यांना पुढे आठवले पाहिजे, असा स्पष्ट इशारा अजित पवार यांनी दिला.

अरे जनाची नाही तरी मनाती ठेवायची, तिथे १४ संचालक हे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे आहेत. त्या ठिकाणी चंद्रशेखर घुले यांचा पराभव होतो. असली माणस नकोत आम्हाला, यांचे काय करायचे असेही पवार म्हणाले. अशी माणस आम्हला नको, आम्ही गरिबांकडे जाऊन हात जोडू ती गरीब माणस विश्वासाने आपल्या बरोबर राहतील, गरीब शब्दाला पक्की असतात, पण पद दिलेली मात्र, चुकीची वागतात, असा हल्लाबोल अजित पवार यांनी केला.

Ajit Pawar News
Pune News : रामदास ठाकुरांचा आमदारकीसाठी पुन्हा शड्डू : मोहितेंच्या 'त्या' विधानाने राष्ट्रवादीतील इच्छूक लागले कामाला

दरम्यान, जिल्हा बॅंक निवडणुकीत महाविकास आघाडीचे 14 संचालक होते. तर भाजपचे चार आणि त्यांना माननारे दोन असे एकून सहा संचालक भाजपकडे होते. महाविकास आघाडीचे उमेदवार घुले यांना 9 मते पडली. त्यामुळे आघाडीची चार मते फुटली. या मतांमुळे कर्डिले यांचा विजय झाला. त्यामुळे या फुटलेल्या संचालकांना अजित पवार यांनी या संचालकांना इशारा दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.