VIDEO काँग्रेसचे 2 आमदार शिंदे गटाच्या वाटेवर; 'क्रॉस व्होटिंग' कारवाईच्या आधीच पक्षाला रामराम ठोकणार

Hiraman Khoskar Jitesh Antapurkar will resign from Congress: सात आमदारांवर तातडीने कारवाई करावी, यासाठी पक्षातील इतर आमदारांनी राज्यातील नेत्यांवर दबाव वाढवला आहे. यात हिरामण खोसकर आणि जितेश अंतापूरकर यांची नावे अग्रस्थानी आहे.
Hiraman Khoskar Jitesh Antapurkar will resign from Congress
Hiraman Khoskar Jitesh Antapurkar will resign from CongressSarkarnama
Published on
Updated on

'क्रॉस व्होटिंग' कारवाईच्या आधीच काँग्रेसचे दोन आमदार पक्षाला रामराम ठोकणार असल्याची माहिती आहे. हे दोन्हीही आमदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाच्या वाटेवर असल्याचे समजते. काल रात्री उशिरा काँग्रेसच्या हिरामण खोसकर आणि जितेश अंतापूरकर या दोन आमदारांनी एकनाथ शिंदे यांची वर्षा येथे भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा आदेश झुगारत सात आमदारांनी 'क्रॉस व्होटिंग' केल्याची चर्चा आहे. यात सात आमदारांवर तातडीने कारवाई करावी, यासाठी पक्षातील इतर आमदारांनी राज्यातील नेत्यांवर दबाव वाढवला आहे. यात हिरामण खोसकर आणि जितेश अंतापूरकर यांची नावे अग्रस्थानी आहे.

एकीकडे पक्षश्रेष्ठींनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. हिरामण खोसकर आणि जितेश अंतापूरकर यांच्यावर कारवाईची शक्यता नाकारता येत नाही. ही कारवाई होण्याआधाची दोन्ही आमदार काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याचा विचारात आहेत.

Hiraman Khoskar Jitesh Antapurkar will resign from Congress
Rohit Pawar: अजितदादा, ती चूक होती तर , आता असाच दबाव माझ्या मतदारसंघाच्या बाबतीत तुमच्यावर आहे? रोहित पवारांचा सवाल

इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांच्यावर कारवाई होणारच, असा ठाम विश्वास ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला. थोरात यांच्या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे. आमदार हिरामण खोसकर यांची राजकीय कारकीर्द संकटात सापडली आहे.

क्रॉस व्होटिंग केल्याच्या आरोपावर आमदार खोसकर यांनी सविस्तर भूमिका मांडली आहे. खोसकर मतदानाच्या प्रक्रियेबद्दल माहिती देतानाच काँग्रेस नेत्यांना मतदानाची तपासणी करण्याची विनंती केली आहे.

"माझ्यासारखा गरीब कार्यकर्ता... नाना पटोले असतील, वरिष्ठ असतील, त्यांनी कुठेतरी हे थांबवलं पाहिजे. माझ्यावर कारवाई करायची, तर जरुर करा. माझी पक्षातून हकालपट्टी करा. परंतू आधी मतदान चेक करा", असे भूमिका हिरामण खोसकर यांनी घेतली आहे.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय म्हणून अंतापूरकर यांची ओळख आहे. चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काही आमदार त्यांच्यासोबत जातील, अशी चर्चा होती. त्यात अंतापूरकर यांचे नाव आघाडीवर होते. त्यामुळे आमदार जितेश अंतापूरकर यांनी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराचा प्रचार केला नव्हता. शिवाय, विधान परिषदेच्या निवडणूकीत त्यांनी क्रॉस व्होटिंग केल्याची चर्चा आहे.

नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीचे नऊ उमेदवार निवडून आले होते, तर महविकास आघाडीतील शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांचा पराभव झाला होता. त्या निवडणुकीत काँग्रेसची सात मते फुटल्याची चर्चा होती. त्यात आमदार जितेश अंतापूरकर यांच्या नावाचाही समावेश होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com