Maharashtra Rain News: मुंबई, पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने थैमान घातले आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र गुजरातकडे सरकत आहेत. हे क्षेत्र मुंबईजवळ असल्याने त्याचा प्रभाव जाणवण्यास सुरवात झाली आहे. आज मुंबईत मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. गेल्या 24 तासांपासून मुंबई, पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्राला पावसाने झोडपून टाकले आहे.
हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पालघर, रायगडमध्ये पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. हवामान खात्याच्या या इशाऱ्यानंतर मुंबईसह अनेक जिल्ह्यांमधील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुंबई विद्यापीठाच्या आज होणाऱ्या सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत.
नवी मुंबई
मुंबई
मुंबई उपनगर
कल्याण
पालघर
रायगड
रत्नागिरी
ठाणे
सध्या अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. गैरसोय टाळण्यासाठी शिक्षण संचालनालयाने विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेण्यासाठी दोन दिवसांची मुदतवाढ दिली आहे. 22 ऑगस्टपर्यत मुदत वाढविण्यात आली आहे. ठाण्याहून सीएसएमटीकडे जाणारी रेल्वे वाहतूक बंद झाली आहे.
ठाण्यावरुन सीएसएमटीकडे जाणाऱ्या स्थानकांवर पाणी साचले आहे. मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वे मार्गावरील लोकल गाड्या उशिराने धावत असल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक ठिकाणी रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने वाहतुकीचा वेग मंदावला आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा आणखी तीव्र झाल्यामुळे पश्चिमेकडे त्याचा जोर अधिक आहे.
महाराष्ट्रातील बहुतांश सर्व जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. मुंबई पावसाला उधाण आले आहे.
मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेला पाऊस आणखी 24 तास राहण्याची शक्यता आहे.
सतत होणाऱ्या मुसळधार पावसामुळे घाटमाथ्यावर असणाऱ्या पर्यटन क्षेत्रावर जाणं टाळा, असे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबईमध्ये गेल्या 24 तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे.
उपनगरांमध्ये पावसाचा जोर अधिक आहे. अनेक भागांमध्ये 200 मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे.
विक्रोळीत सर्वाधिक 255.5 मिमी पाऊस झाल्याचे समोर आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.