Maharashtra Tet Scam : अपात्र ठरविलेल्या शिक्षकांचे वेतन बंद ; शिक्षण संचालकांचा दणका

Maharashtra Tet Scam : सांगली जिल्ह्यातील सहा शिक्षकांची पगार ऑगस्ट महिन्यापासून रोखण्याचा निर्णय शिक्षण संचालक कार्यालयाकडून घेण्यात आला आहे.
MAHA TET Exam
MAHA TET Examsarkarnama

सांगली : टीईटीच्या परीक्षेतील गैरप्रकार उघडकीस आल्यानंतर राज्य सरकारने 7 हजार 874 उमेदवारांना (Maharashtra Tet Scam) अपात्र ठरविल्यानंतरही त्यांतील 576 उमेदवार आजही विविध शाळांत कार्यरत असल्याने शिक्षण संचालनालयाने बुधवारी (ता. 17) त्यांचे शालार्थ आयडी गोठविले आहेत. त्यांचे वेतन ऑगस्टपासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. (Maharashtra Tet Scam latest news)

शिक्षण संचालक डॉ. दिनकर पाटील यांनी याबाबतचे आदेश काढून या उमेदवारांची नावे ऑगस्टच्या वेतन देयकात समाविष्ट असण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यांची नावे तातडीने वगळूनच इतर कर्मचार्‍यांचे ऑगस्टचे वेतन देयक सादर करावे, असेही आदेश दिले आहेत.

शिक्षक पात्रता परीक्षेच्या घोटाळ्यात अपात्र ठरलेल्या सांगली जिल्ह्यातील सहा शिक्षकांची पगार ऑगस्ट महिन्यापासून रोखण्याचा निर्णय शिक्षण संचालक कार्यालयाकडून घेण्यात आला आहे. त्याबाबतचे आदेश सांगली जिल्हा परिषद प्रशासनाला प्राप्त झाले आहेत, मात्र सहापैकी चार शिक्षक सेवेत आहेत. त्यांचे पगार रोखण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

2019 मधील शिक्षक पात्रता परीक्षेतील गैरप्रकार उघडकीस आल्यानंतर सरकारने 7 हजार 874 उमेदवारांना अपात्र ठरविले होते. त्यापैकी जवळपास 576 उमेदवार आजही विविध शाळामध्ये कार्यरत आहेत. त्यांचे शालार्थ आयडी शिक्षण संचलन संचालनालयाने गोठवले आहेत. त्याचे वेतन ऑगस्टपासून रोखण्याचा निर्णय घेतला आहे.

MAHA TET Exam
राऊतांचे निकटवर्तीय पाटकरांच्या विरोधात गुन्हा दाखल : 38 कोटींच्या फसवणुकीची सोमय्यांची तक्रार

यामध्ये सांगली जिल्ह्यातील सहा शिक्षकांचा समावेश असल्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनाकडून आली आहे. सरकारकडून आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा गैरप्रकारतील सहा व्यक्तिंपैकी एका व्यक्तीच्या मान्यता यापूर्वीच नाकारण्यात आली आहे. तर जागा रिक्त नसल्याने एका शिक्षकाचा शालार्थ आयडी काढलेला नाही.त्यामुळे उरलेले चार जण सध्या सेवेत असून त्यांचे पगार थांबवण्यात आले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com