
Mumbai News : महायुती सरकार स्थापन झाले असून, त्यांचा बहुमताचा आकडा मोठा आहे. यात विरोधकांचा आवाज दबला जाईल, अशी भीती विरोधकांनी विधानसभा अध्यक्षांच्या निवडीनंतरच्या भाषणात व्यक्त केली. राहुल नार्वेकर यांची एकमताने विधिमंडळाच्या अध्यक्षपदी निवडीनंतर, त्यांच्या अभिनंदनीय भाषणात विरोधकांनी ही नरमाईचा सूर अळवत ही भीती मांडली.
यावर आभार भाषणात राहुल नार्वेकर यांनी काँग्रेसचे नाना पटोले यांनी मोठा शब्द दिला. "नाना संख्या कमी असली, तरी तुमचा आवाज कमी होणार नाही, याची जबाबदारी माझी असेल", अशी ग्वाही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली.
राहुल नार्वेकर म्हणाले, "राज्यातील जनतेच्या आशा, आकांक्षा या सभागृहाकडून आहेत. त्यानुसार काम झाल पाहिजे. ज्येष्ठ सदस्य आहे. पहिली टर्म असलेले 78 सदस्य देखील आहेत. मतदारांच्या (Voter) जनतेच्या भावनांची कदर करून इथं आमदारांनी काम करावं". सर्वांना इथं बोलण्याची संधी दिली जाईल. 13 कोटी जनतेला न्याय देण्याची मोठी जबाबदारी आपल्यावर असल्याची जाणीव असल्याचे राहुल नार्वेकर यांनी सांगितले.
सभागृहात विरोधकांची संख्या कमी असल्यावरून आवाज दाबला जाईल, यावर राहुल नार्वेकर यांनी महाविकास आघाडीमधील काँग्रेस (Congress) नेते नाना पटोले यांना मोठा शब्द दिला. नार्वेकर यांनी नाना संख्या कमी असली, तरी तुमचा आवाज कमी होणार नाही, याची जबाबदारी माझी असेल, असे सांगितले.
सभागृहातील नियम तोडून बेशिस्तपणे कोणी वागल्यास, तेंव्हा दुःखी होतो. संसदीय लोकशाहीला बळकट करण्यासाठी सभागृहात कोणीही बेशिस्तीचे वर्तन करणार नाही, याची खबरदारीचे आवाहन करताना विरोधकांचे राहुल नार्वेकर यांनी कान टोचले. अध्यक्ष म्हणून संपूर्ण मत जाणून घेईल. मात्र सभात्यागाचे प्रकार या भवनात होऊ देऊ नयेत. विरोधी पक्षाची बाजू जाणून घ्यायची ही माझी पण जबाबदारी आहे, तशी त्याची मला कल्पना असल्याचे नार्वेकर यांनी म्हटले.
जबाबदारी किती महत्त्वाची आहे हे सांगताना, 'तुम पर कोई जबदरस्ती नही, की तुम मेरी सारे बांतें मानो, तुझे सिर्फ इतना पता हैं की, तुम मेरे लिए जरुरी हो, आगे फिर तुम जानो', असा टोला नार्वेकर यांनी शायरीतून लगावला. ही संधी आपल्या राज्यासाठी खूप मोठी आणि महत्त्वाची आहे. राज्यातील लोकांसाठी, बळीराजासाठी, गोरगरिब जनतेसाठी, शेतकऱ्यांसाठी ही मोठी संधी असल्याने सर्वांनी मिळून काम करू या, असेही नार्वेकर यांनी म्हंटले.
विधानसभा इमारतीच्या सुशोभिकरणाची जबाबदारी पार पडताना देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचे नेहमीच सहकार्य लाभले. आणखी काही सुधारणा आहेत, त्यासाठी देखील सहकार्य लाभेल, असेही नार्वेकर यांनी म्हटले. आमदारांच्या निवासाचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल.
महाराष्ट्रातील विधानसभा आणि विधिमंडळाच्या कामकाजाकडे देशातील सर्व कायदेतज्ज्ञांचे, लोकप्रतिनिधींचे लक्ष असते, त्यामुळे सर्वांची जबाबदारी आहे की, सर्वांनी सभागृहाच्या कामकाजात सहभागी व्हावे. तारांकीत प्रश्नांमध्ये, लक्षवेधी सूचनांमध्ये सहभाग घ्यावा. गेल्यावर्षी रेकाॅर्ड ब्रेक लक्षवेधी सूचना घेतल्याची आठवण राहुल नार्वेकर यांनी करून दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.