Bahujan Vikas Aghadi : गुजरातमधून येणाऱ्या तब्बल 100 ट्रॅव्हल्स 'बविआ'च्या कार्यकर्त्यांनी अडवल्या; केला 'हा' गंभीर आरोप

Gujarat to Maharashtra travel disruption: राज्यभरात विधानसभा निवडणुकीसाठी आज बुधवारी (ता.20) सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. मात्र, ऐन मतदानाच्या दिवशीच विरार शिरसाड फाट्यावर गुजरात पासिंगच्या तब्बल 100 ट्रॅव्हल्स बविआच्या कार्यकर्त्यांनी अडवल्या आहेत.
Virar Assembly Election 2024
Virar Assembly Election 2024Sarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Assembly Election 2024 : राज्यभरात विधानसभा निवडणुकीसाठी आज बुधवारी (ता.20) सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. मात्र, ऐन मतदानाच्या दिवशीच विरार शिरसाड फाट्यावर गुजरात पासिंगच्या तब्बल 100 ट्रॅव्हल्स बविआच्या कार्यकर्त्यांनी अडवल्या आहेत.

या ट्रॅव्हल्समधून मतदारांना आमिष दाखवून त्यांना मतदानासाठी घेऊन जात असल्याचा आरोप बविआच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे. वसई विरारसह मुंबई परिसरातील मतदारांना आमिष दाखवण्यात येत असल्याचं बविआच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे.

विरार शिरसाड फाटा येथे मध्यरात्री पोलिस मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आले होते. दरम्यान पोलिसांनी या ट्रॅव्हल्सची तपासणी केल्यानतंर त्या सोडून देण्यात आल्या आहेत. मात्र, ट्रॅव्हल्सला पासिंग असले तरी त्यांना माणसे नेण्याचं पासिंग नसल्याचा आरोप बहुजनच्या कार्यकर्त्यांनी केल्यामुळे विरारमधील राजकारण तापलं आहे.

Virar Assembly Election 2024
Maharashtra Election 2024 Exit Poll LIVE : एक्झिट पोलचे कल महायुतीच्या बाजुने ; फडणवीसांनी घेतली सरसंघचालकांची भेट!

बविआच्या कार्यकर्त्यांमुळे राज्यातील राजकारणात खळबळ

दरम्यान, बविआच्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी काल राज्याच्या राजकारणत मोठी खळबळ उडवून दिली होती. भाजपचे (BJP) राष्ट्रीय नेते आणि सरचिटणीस विनोद तावडे यांनी एका हॉटेलमध्ये पैसे वाटल्याचा आरोप बविआच्या कार्यकर्त्यांनी केला होता. तसंच यावेळी बविआच्या कार्यकर्त्यांनी तावडेंना घेराव घालत मीडियाच्या कॅमेऱ्यासमोर अनेक तास बसवून ठेवलं होतं.

Virar Assembly Election 2024
Maharashtra Voting Today 20 November 2024 : EVM बंद ; मालेगाव, नागपूर, नाशिक, कोथरुड, जामनेरमध्ये मतदारांचा खोळंबा

तर या हॉटेलमधून दहा लाखांची रोख रक्कम जप्त करण्यात आली. शिवाय विनोद तावडे (Vinod Tawde) यांच्याकडे कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना पैसे देण्याबाबतच्या नोंदी सापडल्याचा दावा आमदार क्षितिज ठाकूर यांनी केला होता.त्यामुळे काल दुपारपासून राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com