Ajit Pawar on Loksabha : लोकसभा जागा वाटपासाठी महाविकास आघाडी समिती बनविणार

Maharashtra loksabha Election: कर्नाटकच्या निकालामुळे विरोधकांचा आत्मविश्वास वाढला आहे.
Ajit Pawar on Loksabha :
Ajit Pawar on Loksabha :Sarkarnama
Published on
Updated on

Mahavikas Aghadi on Loksabha news: राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या आघाडीने 2019 मध्ये एकत्र निवडणूक लढवली. पण यावेळी महाविकास आघाडी म्हणून आम्ही निवडणूक लढवणार आहोत. जागावाटपाच्या फॉर्म्युल्यासाठी महाविकास आघाडीतील तीन सदस्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. ही समिती जागावाटपाच्या फॉर्म्युल्यात जागावाटपासंदर्भात आढावा घेईल. जागावाटपात होणारा गोंधळ टाळण्यासाठी ही समिती गठीत करण्यात यावी, अशी चर्चा रविवारी झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत झाली, अशी माहिती विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली. (Mahavikas Aghadi Committee will be formed for allotment of Lok Sabha seats)

अजित पवार मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. 'या तीन पक्षांनी लोकसभेच्या ४८ जागांचं वाटप करावं आणि कोणत्या जागा कोणी लढवायच्या हे ठरवावं. त्यासोबतच जर विधानसभेच्याही २८८ जागांचीही चर्चा करता आली तर तीही करावी. कारण कदाचित लोकसभेसोबतच महाराष्ट्रात विधानसभेच्याही निवडणुका होतील, असा सुतोवाच काही लोकांनी केला आहे. त्यामुळे ऐनवेळी निवडणुका लागल्यानंतर त्यावर चर्चा करण्यापेक्षा त्याआधीच यावर चर्चा झालेली बरी, अशी पद्धतीने काल साधक बाधक चर्चा झाली.' (Maharashtra Politics)

Ajit Pawar on Loksabha :
Bhandara District BJP : जिल्हाध्यक्ष बदलण्याच्या हालचालींना वेग, ‘प्रकाशपर्व’ येणार की ‘वसंत’ फुलणार ?

'जागावाटपाबद्दल प्रत्येक पक्ष एक-एक किंवा दोन-दोन नावं देऊ शकतात, त्याबाबत अद्याप काही ठरलं नाही. त्याबाबत तीन पक्षातील सहा लोक बसून ४८ जागांचं कसं वाटप करायचं, आणि विधानसभेच्या २८८ जागांसंदर्भात कशी चर्चा करायची हेही ठरवतील. या तीन पक्षांसह इतर मित्रपक्षांनाही सोबत घेण्याबाबत चर्चा झाली. कारण वज्रमूठ सभा घेत असातना काही मित्रपक्षही आमच्यासोबत स्टेजवर बसले होते.' (Mahavikas Aghadi news)

'दोन दिवसांपुर्वी लागला. यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मला, उद्धव ठाकरे आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना बोलावून घेतलं. यावेळी मी, संजय राऊत, जयंत पाटील असा आम्हीही त्या बैठकीला उपस्थित होतो. बैठकीनंतर नाना पटोले, संजय राऊत आणि जयंत पाटील यांनी बैठकीबद्दल कालचमाहिती दिली. पण कर्नाटक निकालानंतर काही राज्यांचा अपवाद वगळता काही राज्य वगळता देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सत्ता आली. त्यामुळे भाजपचा विश्वास दुणावला आहे. पण विरोधक थोडे नकारात्मक झाले होते.' (Ajit Pawar news)

पण ज्या पद्धतीने कर्नाटकचा निकाल लागला. अनेक एक्सिट पोलचेही अंदाज चुकले. पण काँग्रेसने जितक्या जागा मिळल्या त्याने पुन्हा एकदा विरोधकांचा उत्साह वाढला आहे. कर्नाटकच्या निकालानंतर आता महाराष्ट्रातही त्याच दृष्टीने काय केलं पाहिजे आणि राहिलेल्या वज्रमुठ सभा झाल्या पाहिजेत, यावरही चर्चा झाली, असही त्यांनी सांगितलं.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com