Mumbai News : लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीने विजय मिळवल्याने चांगलेच कॉन्फिडन्स वाढले आहे. त्यामुळे येत्या काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी सोबतच्या मित्रपक्षांना संधी देणार का ? याबाबत भूमिका स्पष्ट केली नाही. त्यामुळे आघाडीतील मित्रपक्षात संभ्रमाचे वातावरण आहे.
महाराष्ट्रात महाविकास आघाडीसोबत अखिलेश यादव (Akhilesh Yadav)यांच्या समाजवादी पक्षाने हातमिळवणी केली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाला विधानसभा निवडणुकीत कमी जागा मिळाल्या तर स्वबळावर निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी समाजवादी पक्षाने सुरु केली आहे. 19 जुलैला मुंबईतील वांद्रेतील रंग शारदा येथे सर्व खासदारांचा समाजवादी पक्ष महाराष्ट्राच्या वतीने सत्कार केला जाणार आहे. त्यावेळी विधानसभा निवडणुकीची रणनीती ठरवली जाणार आहे. (Akhilesh Yadav News)
समाजवादी पक्षाने (Samajvadi Party) महाराष्ट्र आणि मुंबईत काम सुरु केले आहे. लोकसभा निवडणुकीत संविधान वाचवण्यासाठी लढली गेली. त्यात 37 खासदार आमचे निवडून आलेत, आम्ही देशातील तिसरा मोठा पक्ष आहोत. त्यामुळे आमचा पक्ष देशभर वाढवा यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आमच्या सर्व खासदारांच्या उपस्थित 19 जुलैला कार्यक्रम मुंबईत होणार आहे. यावेळी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव या दौऱ्या दरम्यान खासदार, चैत्याभूमी, मनी भवन, सिद्धिविनायक येथे उपस्थित राहतील. त्यानंतर रंग शारदा येथे सत्काराचा कार्यक्रम होणार असल्याचे अबू आझमी यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र हा समाजवाद्यांचा गड आहे. आम्ही आंबेडकर आणि संविधान वाचवण्यासाठी लढणार आहोत. महाराष्ट्रात आम्ही जास्तीत जास्त सीट जिंकण्याचा प्रयत्न करणार आहोत. मविआमध्ये जागा मिळो ना मिळो पण मतांची दुभागणी होऊ नये, यासाठी प्रयत्न असणार आहेत. युपीत जे झालं ते महाराष्ट्रात व्हायला हवे. जागा वाटपासंदर्भात आमचे नेते निर्णय घेतील. आम्ही आमचा प्रस्ताव देणार असल्याचे यावेळी पत्रकार परिषदेत अबू आझमी यांनी सांगितले.
19 जुलैला मुंबईत खासदारांचा होणार सन्मान
समाजवादी पार्टीने आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मिशन मुंबई सुरू केले आहे. अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला राष्ट्रीय पक्ष करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. यूपीमधील सपाचे 37 खासदार यांना मुंबईत बोलावलं आहे. 19 जुलै रोजी रंगशारद येथे कार्यक्रम होणार आहे. सर्व खासदारांचा समाजवादी पक्ष महाराष्ट्राच्या वतीने सत्कार केला जाणार आहे. तर आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आणि मुंबई महानगरपालिका निवडणुकीवर लक्ष केंद्रित करून मुंबईतील आपल्या व्होटबँकेला अधिक सक्षम करण्यासाठी समाजवादी पक्षाने या कार्यक्रमाचं आयोजन केल्याची चर्चा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.