आघाडीचा एक उमेदवार पडणार; चंद्रकांतदादांचा निशाणा कुणावर?

Vidhan Parishad Election 2022| Chandrakant Patil| विधान परिषदेची लढाई ही प्रसाद लाड आणि भाई जगताप यांच्यात नाहीच
 Chandrakant Patil|
Chandrakant Patil|
Published on
Updated on

मुंबई : विधान परिषदेच्या दहा जागांसाठी आज मतदान होत आहे असे असताना भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी विधान परिषदेची लढाई ही प्रसाद लाड आणि भाई जगताप यांच्यात न होता कलेक्टिव्ह लढाई होईल असे सूचक विधान केले आहे. तसेच, आणि या लढाईत भाजपचे पाचही उमेदवार विजयी होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. (Legislative Council election 2022)

विधान परिषद निवडणुकीसाठी (Legislative Council election) महाविकास आघाडीने रणनिती आखली आहे. राज्यसभा निवडणुकीत झालेला पराभव महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) जिव्हारी लागला आहे. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीत त्यांची परतफेड करायची यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे. विधानपरिषदेच्या मतदानाला सुरुवात होण्यापूर्वी चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

 Chandrakant Patil|
राष्ट्रवादीचे दिलीप मोहिते, अण्णा बनसोडे अन् आशुतोष काळे अजून मुंबईबाहेर!

''पराभवाची कारणे लिहून काढायची असतात त्याप्रमाणे महाविकास आघाडीने ती कारणे लिहून काढायला सुरुवात केली आहे. पण महाविकास आघाडीचा एक उमेदवार पडेल, पण तो कोण असेल हे आताच सांगत नाही. भाजपचे पाचही उमेदवार शंभर टक्के विजयी होतील. असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे. राज्यसभा निवडणूकीच्या वेळीही स्ट्रॅटेजी आखली गेली होती. पण देवेंद्र फडणवीस यांची स्ट्रॅटेजीने त्यांच्यावर मात केली.

भाजपच्या उमेदवाराला ज्या अतिरिक्त मतांची गरज आहे ती पुर्ण होईल का असा सवाल त्यांना विचारला असता ते म्हणाले की राज्यसभेला अतिरिक्त मतांची गरज होती. तेव्हा पूर्ण झाली आता विधानपरिषदेच्या निवडणूकीलाही मतांची गरज पुर्ण होईल.''

तसेच विजयी आकडा नसताना भाजपाकडून पैशाची गणितं जुळवली जात असल्याचा आरोप होत आहे. यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, “ ज्यांना पैशाच्या जीवावर कामं करण्याची सवय आहे, त्यांनाच पैसा दिसतो. संबंध, संवाद विकत घेता येत नाहीत. देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रात पाच वर्षे सरकार चालवताना सर्वांशी चांगले संबंध निर्माण केले. हेच सगळे संबंध आता त्यांच्यासाठी उपयोगी पडत आहेत. ''

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com