राष्ट्रवादीचे दिलीप मोहिते, अण्णा बनसोडे अन् आशुतोष काळे अजून मुंबईबाहेर!

विधान परिषद निवडणुकीच्या मतदानाला सुरूवात...
MLA Dilip Mohite Patil, Anna Bansode, Ashutosh Kale Latest Marathi News, MLC Election News
MLA Dilip Mohite Patil, Anna Bansode, Ashutosh Kale Latest Marathi News, MLC Election NewsSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : विधान परिषद निवडणुकीसाठी (Legislative Council Election) राष्ट्रवादी काँग्रेसनं जुळवाजुळव केली असली तरी त्यांचे तीन आमदार अद्याप मुंबईत पोहचले नसल्याचे समजते. राज्यसभा निवडणुकीवेळी उघडपणे मुख्यमंत्र्यांवर नाराजी व्यक्त केलेले पुण्यातील खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील, कोपरगावचे आमदार आशुतोष काळे आणि पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांचा त्यात समोर आहे. (MLC Election Latest Marathi News)

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे सर्व नेते, आमदार मुंबईत आहेत. पण राज्यसभा निवडणुकीवेळी दिलीप मोहिते यांनी नाराजी समोर आली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे त्यांचा रोख होता. पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संपर्क साधल्यानंतर त्यांनी मतदान केलं होतं. आज मोहिते पाटील काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागलं आहे. तर अण्णा बनसोडे हे प्रकृती ठीक नसल्याने थोडे उशिरा मुंबईत पोहचणार असल्याचे समजते.

MLA Dilip Mohite Patil, Anna Bansode, Ashutosh Kale Latest Marathi News, MLC Election News
परदेशात गेलेले क्षितिज ठाकूर मुंबईत दाखल; 'बविआ'ची तीन मतं ठरणार निर्णायक

आशुतोष काळे हेही अद्याप मुंबईत दाखल झालेले नाहीत. त्यांच्याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, तीनही आमदारांची थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी फोनवरून चर्चा झाल्याचे वृत्त 'एबीपी माझा'ने दिले आहे.

समाजवादी पक्षाचं एक मत राष्ट्रवादीला

दहा जागांसाठी आज मतदान होणार आहे. महाविकास आघाडी विरूध्द भाजप अशी खरी लढत असली तरी प्रत्यक्षात भाई जगताप विरूध्द लाड असा हा सामना रंगणार आहे. असं असलं तरी राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही 'सेफगेम' खेळला जात आहे. सगळी गणितं लक्षात घेऊन राष्ट्रवादीनं अतिरिक्त मतं जमवली आहेत. काल एमआयएमच्या एका आमदाराचं मत राष्ट्रवादीला मिळणार असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर आता समाजवादी पक्षाचंही एक मत पारड्यात पाडण्यात पक्षाला यश आल्याचं समजतं. (MLC Election 2022 Latest News)

निवडणुकीत सर्वच पक्षांसाठी एकेक मत महत्वाचे झाले आहे. एमआयएमचे धुळ्याचे आमदार फारुख शहा यांनी आपण एकनाथ खडसे यांना मतदान करणार असल्याचे काल जाहीर केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रथम पसंतीचे उमेदवार रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथ खडसे (Eknath Khadse) या दोन्ही उमेदवारांचे टेन्शन कमी झाले होते.

MLA Dilip Mohite Patil, Anna Bansode, Ashutosh Kale Latest Marathi News, MLC Election News
भाजपच्या किमान 9 मतांना राष्ट्रवादी लावणार सुरुंग; प्रसाद लाड यांचा पराभव निश्चित?

त्यातच आता समाजवादी पक्षाचंही एक मत राष्ट्रवादी मिळणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. त्यामुळे निंबाळकर आणि खडसे हे दोघेही सेफ झोनमध्ये असल्याची चर्चा आहे. पण दुसरीकडे काँग्रेसला आता आणखी धावाधाव करावी लागणार आहे. एमआयएम आणि समाजवादीची प्रत्येकी दोन-दोन मतांसाठी काँग्रेसचे प्रयत्न सुरू होते.

आता काँग्रेसला एमआयएम आणि समाजवादी पक्षाचे प्रत्येक एकच मत मिळणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. रविवारी रात्री उशिरा काँग्रेसचे नेते सुनिल केदार यांनी समाजवादीच्या नेत्यांची भेट घेतल्याचे समजते. पण काँग्रेसला एकच मत देणार असल्याचे त्यांना सांगण्यात आल्याची चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com