Samajwadi Party Politics : 'मविआ'ला धक्का, 'सपा'चा मोठा निर्णय; उद्धव ठाकरेंवर नाराज अबू आझमी नेमकं कोणाच्या संपर्कात?

Uddhav Thackeray Hindutva Abu Azmi Samajwadi Party MVA : महाविकास आघाडीमधून समाजवादी पक्ष बाहेर पडल्याची घोषणा महाराष्ट्राचे समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आझमी यांनी केली.
Samajwadi Party
Samajwadi PartySarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीनंतर हिंदुत्वाची भूमिका घेतली. यावर समाजवादी पक्षाने नाराजी व्यक्त करत, महाविकास आघाडीतून बाहेर पडत असल्याचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आझमी यांनी जाहीर केले.

'सपा'च्या या निर्णयामुळे महाविकास आघाडीला धक्का बसला असून, अबू आझमी कोणाच्या संपर्कात आहेत, याची चर्चा रंगली आहे. तसंच 'ईव्हीएम'वरील मतदानाच्या विरोधात असल्याची भूमिकेवर ठााम असल्याचे अबू आझमी यांनी म्हटले आहे.

अबू आझमी म्हणाले, "'ईव्हीएम'मधील घोटाळ्यामुळे मविआ पराभूत झाल्याचा आरोप होत आहे. ज्या देशांनी 'ईव्हीएम' (EVM) मशीन बनवलं, त्यांनी देखील 'ईव्हीएम'वर मतदान करण्याचे सोडून दिले, याकडे मी सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोगाचे लक्ष वेधत आहे". जिंकणारा 'ईव्हीएम'मुळे पराभूत होऊ शकतो, ईव्हीएम हटवले पाहिजे. संपूर्ण भारतातून मागणी होत आहे. यामुळे 'दूध का दूध और पानी का पानी' होईल. यामुळे ईव्हीएम हटवण्याच्या मागणीवर आम्ही ठाम आहोत, असे अबू आझमी यांनी म्हटले.

Samajwadi Party
Maharashtra Politic's : शिवसेनेला गृहमंत्रिपद देण्यास भाजपचा ठाम विरोध; शिंदेंपुढे ‘या’ तीन मंत्रिपदाचा पर्याय!

महाविकास आघाडी (MVA) समाजवादी विचारसरणीवर एकत्र आली होती, असे सांगून तिथं हिंदू-मुस्लिम असा कोणताही फरक नव्हता. परंतु निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांनी हिंदूंसाठी काम करणारे, हिंदुत्वावर आम्ही काम करणार, अशी भूमिका घेतली. धर्माचा मुद्दा राजकारणात आणणे चुकीचे आहे, अशी भूमिका अबू आझमी यांनी मांडली. याचवेळी ते पुढे म्हणाले, "सहा डिसेंबर आम्ही काळा दिवस मानतो. कोणत्याही आदेशानाही, नियमाने नाही बाबरी मशीद पाडली गेली, त्यावर उद्धव ठाकरे यांची भूमिका शिवसैनिकांची ही चढाई होती. शिवसेनेची महाविकास आघाडीत अशी भूमिका असेल, तर आम्ही अशा आघाडीत राहणार नाही".

Samajwadi Party
CM Devendra Fadnavis Big Statement : मुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीसांची मोठी कबुली; म्हणाले, 'माझ्याकडे अनुभव, तरीही यावेळी...'

'उद्धव ठाकरे यांच्या या भूमिकेवर शरद पवार आणि राहुल गांधी यांनी अ‍ॅक्शन घेतली पाहिजे, अशी देखील मागणी अबू आझमी यांनी केली. आमचे दोनच जागा आहे. त्यांना आम्ही महाविकास आघाडीत राहिलो किंवा नाही राहिलो, तरी काहीच फरक पडत नाही. अखिलेश यादव यांच्या खासगी स्वीय सहायकांच्या कानावर हा सर्व प्रकार घातला आहे', असे देखील अबू आझमी यांनी सांगितले.

अबू आझमी कोणाच्या संपर्कात?

समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी आणि रईस शेख यांनी विधिमंडळात शपथ घेतली. महाविकास आघाडीच्या आमदारांबरोबर त्यांनी सभात्याग केला नाही. त्यामुळे समाजवादी पक्ष हा महाविकास आघाडीतून बाहेर पडल्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. तत्पूर्वी अबू आझमी यांनी निवडणुकीत महाविकास आघाडीत समन्वय नव्हत. महाविकास आघाडीत असलेले पक्षाचे नेते एकमेकांच्या व्यासपीठावर जात नव्हते, याकडे देखील अबू आझमी यांनी लक्ष वेधले. दरम्यान, समाजवादी पक्षाचे अबू आझमी महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे समाजवादी पक्ष राज्यात आगामी काळात कोणती भूमिका घेतो, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com