Devendra Fadnavis: फडणवीसांचा एकनाथ शिंदेंना फोन; काय झाली चर्चा Video पाहा

Maharashtra Government Formation LIVE Updates: शिंदे हे सध्या साताऱ्यातील त्यांच्या दरे गावात आहेत. त्याठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. शिंदे हे आज दरे गावाहून ठाण्यात त्यांच्या घरी येणार असल्याची माहिती आहे.
 Devendra Fadnavis Eknath Shinde
Devendra Fadnavis Eknath Shinde sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 01 Dec : देवेंद्र फडणवीस हे 5 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. मुंबईतील आझाद मैदानात हा शपथविधी सोहळा होणार आहे.

काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आजारी असल्यामुळे ते त्यांच्या मुळगावी (दरे जि. सातारा) उपचार घेत आहेत. या शपथविधी सोहळ्यास शिंदे येणार की नाही, याबाबतचे प्रश्न विचारण्यात येत आहेत. फडणवीस यांनी त्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी फोन केल्याची माहिती मिळाली आहे. साम टिव्हीने याबाबतचे वृत्त दिले आहे.

फडणवीसांनी शिंदेंच्या प्रकृतीची विचारपूस केल्याची माहिती सुत्रांनी दिली. एकनाथ शिंदे यांच्या प्रकृती अचानक बिघडल्याची बातमी आली होती. शिंदे हे सध्या साताऱ्यातील त्यांच्या दरे गावात आहेत. त्याठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

 Devendra Fadnavis Eknath Shinde
Top 10 News : शिंदेंची नाराजी अन् शपथविधीचा मुहूर्त, बार्शीतील पराभवाचे कारण...-वाचा महत्वाच्या घडामोडी

शिंदे हे आज दरे गावाहून ठाण्यात त्यांच्या घरी येणार आहेत. ते ठाण्यात आल्यानंतर महायुतीच्या नेत्यांसोबत त्यांची बैठक होणार आहे. बैठकीत खातेवाटपावर चर्चा होणार आहे. शिवेसनेला (शिंदे गट) गृहखात्यासह अन्य काही महत्वाची खाती हवीत आहेत.

 Devendra Fadnavis Eknath Shinde
Assembly Election : महाराष्ट्रातील पराभवानंतर काँगेसला दिल्लीतही झटका; केजरीवालांकडून मोठा निर्णय

दुपारनंतर शिंदे ठाण्यात दाखल होणार आहेत. सांयकाळी महायुतीच्या तिन्ही प्रमुख नेत्यांची बैठक होण्याची शक्यता आहे. या बैठकीनंतर खाते वाटपाचे चित्र स्पष्ट होईल. उद्या (सोमवार) दुपारपर्यंत कोणती खाती कुणाला मिळतील, यावर अधिकृतरित्या जाहीर करण्यात येईल, असे समजते.

शिवसेनेचे नेते, माजी मंत्री संजय शिरसाट यांनी एकनाथ शिंदे यांच्या दाढीचा संदर्भ देत विरोधकांना इशारा दिला आहे. "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जेव्हा जेव्हा दाढीवरून हात फिरवतात. तेव्हा तेव्हा राज्यात मोठ्या घडामोडी घडतात. त्यामुळे ठाण्याच्या दाढीला हलक्यात घेऊ नका. हेच हलक्यात घेण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी केलं आणि आता त्यांची काय अवस्था आम्ही करून ठेवली हे महाराष्ट्राने पाहिलं आहे. त्यामुळे जेव्हा शिंदे मुंबईत येतील. तेव्हा सगळ्या घडामोडी घडतील. कोणी त्यांना हलक्यात घेता कामा नये, अशा शब्दात शिरसाटांनी इशारा दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com