Mahesh Gaikwad : आता आठ गोळ्या घालणार...; गोळीबारातून वाचलेल्या महेश गायकवाड यांना पुन्हा धमकी

Threaten to Death Mahesh Gaikwad : फेसबुक अकाऊंटवरून दिलेल्या धमकीनंतर गायकवाडांनी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसानी तपास सुरू केला आहे.
Mahesh Gaikwad
Mahesh GaikwadSarkarnama

Thane Political News : शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. फेसबुक अकाउंटवरुन दीपक कदम नावाच्या व्यक्तिने धमकी दिल्याचे पुढे आले आहे. त्या प्रकरणी महेश गायकवाड यांनी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केल्याचे माहिती आहे.

जमीनीच्या वादातून भाजप आमदार गायकवाड यांनी हिललाईन पोलिस ठाण्यात शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यासह त्यांच्या साथीदारावर गोळीबार केला होता. या प्रकरणी आमदार गायकवाड हे न्यायालयीन कोठडीत आहे. या प्रकरणातील त्यांचा मुलगा वैभव गायकवाड हा फरार आहे. या घटनेला काही महिने उलटत नाही तोच महेश गायकवाड यांना पुन्हा जीवे ठार मारण्याची धमकी आल्याने खळबळ उडाली आहे.

दीपक कदम नावाच्या व्यक्तीने फेसबुक अकाउंटवरुन महेश गायकवाड यांना धमकी दिली आहे. भाजप आमदार गायकवाड यांनी चार गोळ्या घातल्या होत्या. मी आठ गोळ्या घालीन, अशी धमकीच कदम याने गायकवाड यांना दिली आहे. ही धमकी येताच महेश गायकवाड यांनी कल्याण कोळसेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सोशल मीडियाद्वारे महेश गायकवाड यांना जीवे मारण्याची धमकी आल्याने पोलिसांनी कदम याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

धमकी देणारा कदम हा कोण व्यक्ती आहे? त्याने अशा प्रकारे महेश गायकवाड यांना का धमकी दिली? या प्रकरणाचा उलगडा तपासांती होणार आहे. तर याबाबत महेश गायकवाड यांनी तीन महिन्यापूर्वी माझ्यावर हल्ला झाला होता. त्यामधील काही आरोपी अजून पसार आहेत.

Mahesh Gaikwad
Sangli Lok Sabha Result : सांगलीत 'विशालपर्व’ सुरू, भाजपाला अंतर्गत नाराजीचा फटका!

याबाबत गायकवाड म्हणाले, त्या हल्ल्यातील आरोपीचे नाव घेऊन मला धमकी दिली आहे. या घटनेला तीन महिने झाले असून फरारी पोलिसांच्या हाती लागले नाहीत. यामध्ये कुणाचा राजकीय दबाव आहे? मी काही दिवसांनी सांगेल पोलिसांनी या फरार आरोपींना अटक करावी. आताच्या धमकीबाबत तक्रार दिली असून पोलिसांनी त्यांना अटक करण्याचे आश्वासन दिल्याचे गायक आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Mahesh Gaikwad
Rohit Pawar in Koregaon : रडीच्या डावाने शिंदे खचणार नाहीत, पुन्हा लढतील; रोहित पवारांना विश्वास

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com