Thane BJP News : शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची निवडणूक मोर्चेबांधणी : मनसेचा विधानसभेचा उमेदवार; भीम अर्मीचा जिल्हाध्यक्ष गळाला

भाजपने आगामी निवडणुकीची तयारी जोरात सुरू केली आहे. त्यात विरोधकांबरोबरच मित्रपक्ष बनू पाहणाऱ्या मनसेलाही दणका दिला आहे.
BJP
BJPSarkarnama

ठाणे : भारतीय जनता पक्षाने (BJP) शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसनंतर आपला मोर्चा आता मित्रपक्ष बनू पाहणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे (MNS) वळविला आहे. भाजपने मनसेचा कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातील २०१९ च्या निवडणुकीतील मनसेचा उमेदवारच पळविला आहे. तसेच, भीम आर्मीच्या ठाणे (Thane) जिल्हाप्रमुखांनाही गळाला लावले आहे. (Mahesh Kadam of MNS, Nitin Waghmare of Bhim Army joined BJP)

मनसेचे ठाणे शहरातील माजी विभाग अध्यक्ष आणि कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघाच्या २०१९ च्या निवडणुकीतील उमेदवार महेश कदम, तसेच,भीम आर्मीचे ठाणे जिल्हाप्रमुख नितीन वाघमारे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये आज (ता. १२ फेब्रुवारी) प्रवेश केला. भाजपाच्या मुंबईतील प्रदेश कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्वांचे स्वागत केले. भाजपने आगामी निवडणुकीची तयारी जोरात सुरू केली आहे. त्यात विरोधकांबरोबरच मित्रपक्ष बनू पाहणाऱ्या मनसेलाही दणका दिला आहे.

BJP
Jitendra Awhad News : आव्हाडांना मुंब्र्यात घेरण्याची मुख्यमंत्र्यांची खेळी : राष्ट्रवादीचा ज्येष्ठ नेता गळाला; माजी नगरसेवक शिंदेंच्या कार्यक्रमाला

भाजपचे आमदार आणि ठाणे जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर हेही या कार्यक्रमाला उपस्थित होते. मनसेबरोबरच महेश कदम यांनी स्वामी फाऊंडेशनच्या माध्यमातून समाजकार्य केले आहे. विधानसभा निवडणुकीबरोबरच कदम यांनी २०१७ मधील महापालिकेची निवडणूकही लढवली होती. कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून त्यांनी विधानसभेची मागील निवडणूकही लढवली होती.

BJP
Sangola News : गणपतआबांच्या अंत्यविधीवेळी घडलेल्या प्रकाराबद्दल शेकाप नेत्याने मागितली जाहीर माफी

भीम आर्मीचे जिल्हाप्रमुख नितीन वाघमारे यांनाही अनेक विकासात्मक कामे केली आहेत. या वेळी महापालिकेतील माजी गटनेते मनोहर डुंबरे, भाजपाचे प्रदेश सचिव संदीप लेले, माजी नगरसेवक सुनेश जोशी, ठाणे परिवहन समितीचे सदस्य विकास पाटील, भाजपाचे शहर सरचिटणीस विलास साठे, कैलास म्हात्रे आदींची उपस्थिती होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com