Mahim Assembly Constituency : अमित ठाकरेंना काकांचा छुपा पाठिंबा? उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं...

Uddhav Thackeray Shiv Sena MNS : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे माहिम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.
Amit Thackeray, Uddhav Thackeray
Amit Thackeray, Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : मुंबईतील वरळी आणि माहिम या दोन विधानसभा मतदारसंघाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. वरळीमध्ये आदित्य ठाकरे तर माहिममधून अमित ठाकरे हे चुलतबंधू निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची वरळीत पुतण्याच्या विरोधात सभा होणार असली तरी उध्दव ठाकरे मात्र माहिममध्ये सभा घेणार नसल्याने चर्चांना उधाण आले आहे.

माहिम मतदारसंघात तिहेरी लढत होत आहे. दोन्ही शिवसेना आणि मनसेचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे उध्दव ठाकरे यांच्याकडून त्यांच्याविरोधात उमेदवार दिला जाणार नाही, अशी चर्चा होती. कारण राज ठाकरेंनी मागील निवडणुकीत आदित्य यांच्या विरोधात उमेदवार दिला नव्हता.

Amit Thackeray, Uddhav Thackeray
Rohit Pawar: सदाभाऊंच्या तोंडून जो गाळ बाहेर पडला त्याला काळ योग्य उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही!

माहिममध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा उमेदवार असला तरी आता त्यांचा अमित यांना छुपा पाठिंबा असल्याचे तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहे. याला कारणही तसेच आहे. उध्दव ठाकरेंची एकही सभा किंवा रोड शो या मतदारसंघात नियोजित नाही. त्यामुळे या चर्चांना बळ मिळाले आहे.

याविषयी बोलताना स्वत: ठाकरेंनी केलेल्या विधानामुळे आता त्याला बळकटी मिळू लागली आहे. ते म्हणाले, माहिम हा माझा, शिवसेनेचा मतदारसंघ आहे. मुंबईत कालची सभा झाली आणि 17 तारखेला सभा होणार आहे. या अलीकडे-पलीकडे मी मुंबईबाहेरच आहे. कारण मुंबईकरांवर माझा विश्वास आहे, माझ्यावर मुंबईकरांचा विश्वास आहे. महाराष्ट्राचा माझ्यावर विश्वास आहे.

Amit Thackeray, Uddhav Thackeray
Rohit Pawar: सदाभाऊंच्या तोंडून जो गाळ बाहेर पडला त्याला काळ योग्य उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही!

मी त्यांच्या सगळ्यांच्या दर्शनाला आणि आशीर्वाद घ्यायला जात आहे. असे काही नाही की, एके ठिकाणी गेलो आणि एके ठिकाणी गेलो नाही म्हणजे मी लक्ष देतोय, आणि दुर्लक्ष करतोय. आता वेळच अशी आहे की दिवसाला चार-पाच सभा घेतल्या तरी सगळे मतदारसंघ मी पूर्ण करू शकत नाही. आणि मधला प्रवासाचा काळ पाहिला आणि दिवसाच्या उन्हाच्या वेळा पाहिल्या तर चार सभा होतील, असे मला वाटत नाही, असे ठाकरेंनी स्पष्ट केले.

शिवाजी पार्कवर शेवटची सभा

शिवाजी पार्क येथे 17 नोव्हेंबरला सभेसाठी आम्ही परवानगी मागितली आहे.  हा दिवस शिवसेनाप्रमुखांचा स्मरण दिन असतो. लाखो शिवसैनिक तिथे येत असतात, याहीवेळी येतील. तुमच्या आठमुठेपणामुळे संघर्ष होऊ देऊ नका, असे आम्ही निवडणूक आयोग आणि पोलिसांना सांगत आहोत. संघर्षाची ठिणगी पडू नये, असे वाटत असेल तर आम्ही 17 नोव्हेंबरला शिवसेनेच्या सभेसाठी शिवाजी पार्क मिळावे, ही आमची मागणी त्यांनी मान्य करायला हवी, असे उध्दव ठाकरे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com