Mamata Banerjee : ममता बॅनर्जींकडून राष्ट्रगीताचा अवमान; 12 जानेवारीला निकाल येणार ?

Mamata Banerjee : ममता बॅनर्जी कडून राष्ट्रगीताचा अवमान प्रकरण.
Mamata Banerjee
Mamata Banerjeesarkarnama

Mamata Banerjee : राष्ट्रगीताचा अवमान केल्याप्रकरणी पश्चिम बंगलाच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई सत्र न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर 12 जानेवारी रोजी न्यायालय निकाल देणार आहे. या संदर्भात शिवडी दंडाधिकारी न्यायालयानं 2 मार्च 2022 रोजी ममता बॅनर्जी यांना सुनावणीकरता न्यायालयापुढे हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. या आदेशाला ममता बॅमर्जी यांनी मुंबई सत्र न्यायालयात आव्हान दिले आहे.

Mamata Banerjee
laxman Jagtap Death : असा होता लक्ष्मणभाऊंचा राजकीय प्रवास !

मुंबई दौऱ्यातील एका सार्वजनिक कार्यक्रमात ३ डिसेंबर २०२१ला झालेल्या एका कार्यक्रमात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उपस्थित होत्या. या वेळी राष्ट्रगीत सुरू असतानाच त्या व्यासपीठावरून निघून गेल्या. याप्रकरणात भाजपचे कार्यकर्ते विवेकानंद गुप्ता यांनी बॅनर्जी यांच्याविरोधात राष्ट्रगीताचा अवमान केल्याप्रकरणी कफपरेड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली; मात्र त्याची दखल न घेतल्यामुळे त्यांनी दंडाधिकारी न्यायालयात याबाबत फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) राज्यात शासकिय अतिथी म्हणून आल्या होत्या की, तो त्यांचा खासगी दौरा होता?, अशी विचारणा करत न्यायालयानं राज्य सरकारला करत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश मागील सुनावणी दरम्यान दिले होते. त्यानुसार, 2024 च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांनी इतर सर्व राजकीय पक्षांसोबत संयुक्त बैठक घेतली,म्हणजेच ममतांची मुंबई ( Mumbai) भेट ही शासकीयच होती. त्यामुळे मुख्यमंत्री या नात्यानं त्यांनी शासकीय शिष्टाचाराचे (प्रोटोकॉल) पालन करणे आवश्यक होतं, अशी भूमिका राज्य सरकारनं न्यायालयात मांडली आहे.

Mamata Banerjee
Congress News : कॉंग्रेसच्या नव्या कार्यकारिणीची लवकरच रचना ; सोनिया, राहुल गांधी यांचं स्थान काय राहणार?

काय आहे प्रकरण

मुंबई दौऱ्या दरम्यान मुंबईतील वायबी सेंटर येथे विविध क्षेत्रातील मान्यावर तसेच पत्रकारांशी संवाद साधल्यानंतर राष्ट्रगीताचा कार्यक्रम पार पडला, त्यावेळी बॅनर्जी यांनी राष्ट्रगीत म्हणायला सुरूवात केली. पण त्या राष्ट्रगीत अर्धवट म्हणाल्या. इतकेच नाही तर माध्यमांसमोर खाली बसून राष्ट्रगीत गायल्या. पुढे राष्ट्रगीताच्या दोन ओळी म्हणून कार्यक्रमातून थेट निघून गेल्या. ही क्लिप सोशल मिडीयावर व्हायरल झाली होती. मीडियावर पाहिल्यानंतर भाजपचे मुंबई सचिव विवेकानंद गुप्ता यांनी कफ परेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. परंतु, पोलिसांनी त्यावर कोणतीही कारवाई न केल्याने त्यांनी शिवडी दंडाधिकारी न्यायालयात तक्रार दाखल केली. बॅनर्जींचं हे कृत्य म्हणजे राष्ट्रगीताचा अवमान आणि अनादर असून 1971 राष्ट्रीय सन्मानाच्या अवमान प्रतिबंधक कायद्यानुसार त्या शिक्षेस पात्र असल्याचा दावा गुप्ता यांनी केला आहे. या समन्सला ममता बॅनर्जी यांनी मुंबई सत्र न्यायालयात आव्हान दिले आहे. तूर्तास सत्र न्यायालयानं दंडाधिकारी न्यायालयाच्या कारवाईला दिलेली स्थगित कायम ठेवली आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com