कायदा सुव्यवस्थेवरुन भाजपच्या आमदार आक्रमक अन् फडणवीसांची तंबी

नवी मुंबईतील बिघडलेल्या कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नाबाबत आमदार मंदा म्हात्रे (Manda Mhatre) यांनी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला होता.
Manda Mhatre, Devendra Fadnavis
Manda Mhatre, Devendra Fadnavissarkarnama

Manda Mhatre : नवी मुंबई : नवी मुंबईतील पोलिस ठाण्याअंतर्गत मटका आणि जुगारांचे अड्डे चालत असतील, त्या भागातील वरिष्ठ पोलिसांवर कारवाई करू, असा थेट इशारा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिला. याबाबत नवी मुंबईतील बिघडलेल्या कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नाबाबत आमदार मंदा म्हात्रे (Manda Mhatre) यांनी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देतांना फडणवीस यांनी पोलिस अधिकाऱ्यांना तंबी दिली.

नवी मुंबई शहरात गेल्या दोन वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी कारवायांमध्ये वाढ झाल्याचे भाजपच्या (BJP) आमदार मंदा म्हात्रे यांनी अधिवेशानात सांगितले. या संपूर्ण परिसरात सुमारे ५ हजार रसायनयुक्त टँकर पार्किंगच्या नावाखाली उभे राहून बेकायदा धंदे करतात. त्यामुळे भविष्यात कोणताही अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही त्या म्हणाल्या. सायन-पनवेल महामार्गावर बाहेरगावी जाणाऱ्या ट्रॅव्हल बस गाड्यांकडूनही हप्तेवसुली केली जात असल्याने वाहतूक कोंडी होते.

Manda Mhatre, Devendra Fadnavis
अजबच; वीज मीटर बंद करण्यासाठीही मागितली लाच; अभियंता एसीबीच्या जाळ्यात

अनेक पोलिस ठाण्यांच्या हद्दीत आणि नागरी वसाहतींमध्ये मटका, लॉटरी, जुगार, गोमांस तस्करी, अवैध दारू विक्री, डिझेलचोरी, गुटखा वाहतूक, घरफोडी, चेन स्नॅचिंग, मसाज पार्लरच्या नावाखाली देहविक्री असे गैरधंदे सुरू आहे. त्यामुळे महिला व तरुणींच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. पोलिसांच्या कारवाया थंडावल्यामुळे जेएनपीटीमार्गे परदेशात रक्तचंदन तस्करांनी पुन्हा डोके वर काढले आहे. अशा कारवायांविरोधात अनेकदा पोलिसांमध्ये तक्रारी करूनही दखल घेतलेली नाही, असे आरोप म्हात्रे यांनी केले.

मंदा म्हात्रे यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात प्रश्न मांडल्यानंतर नवी मुंबईत वारंवार बदली घेऊन येणाऱ्या त्या पोलिस अधिकाऱ्याची चौकशी होण्याची दाट शक्यता आहे. मंदा म्हात्रे यांनी याआधीसुद्धा आपली भेट घेऊन या अधिकाऱ्यांबाबत तक्रार केल्याचा पुनरुच्चार फडणवीस यांनी केला. तसेच अशा अधिकाऱ्याची चौकशी करून कारवाई करण्याचे आदेशच फडणवीस यांनी दिले.

Manda Mhatre, Devendra Fadnavis
नोकरभरतीच्या नुसत्याच घोषणा : निर्णय घ्या, बच्चू कडूंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

म्हात्रे यांनी नवी मुंबई पोलिसांची गाऱ्हाणी मांडल्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनीही तक्रार केली. बरेच गुन्हेगार एक महिन्यांच्या कारावासातून जामिनावर बाहेर येऊन पुन्हा गुन्हेगारी कृत्य करतात. अशा गुन्हेगारांवर 'मोक्का' अंतर्गत कारवाईची मागणी त्यांनी केली. त्यावर उत्तर देताना फडणवीस यांनी अशा लोकांवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन सभागृहात दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com