Mangal Prabhat Lodha : जरीमारी परिसर दहशतमुक्त! मंगलप्रभात लोढांचा कट्टरपंथिय गुंडाला दणका

Mumbai Sakinaka : हिंदूंना त्रास देण्याचा मालवणी पॅटर्न बंद झाला पाहिजे हीच भूमिका घेत कारवाई केली आहे.
Mangal Prabhat Lodha
Mangal Prabhat LodhaSarkarnama
Published on
Updated on

Mumbai Political News : साकीनाका येथील जरीमारी परिसरात असलेल्या एका मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या नागरिकांना विविध मार्गांनी त्रास देणाऱ्या एका कट्टरपंथिय गुंडाला मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढांनी चांगलाच धडा शिकवला. लोढांच्या या निर्णयाने जरीमारी परिसर दहशतमुक्त झाल्याचे बोलले जात आहे.

अधिक माहितीनुसार, साकीनाका येथील जरीमारी परिसरातील एका कट्टरपंथिय गुंडाकडून धार्मिक तेढ निर्माण होईल, असे कृत्य सुरू होते. त्याबाबत तक्रार केल्याने त्याने स्थानिक हिंदू कुटुंबावर जीवघेणा हल्ला केला. याची माहिती मिळताच मंत्री लोढा यांनी घटनास्थळी जाऊन पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. घडलेले प्रकरण समजावून घेत लोढांनी संबंधित कट्टरपंथिय गुंडाचे अनधिकृत असलेले पाच मजली घर पाडण्याचे निर्देश दिले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Mangal Prabhat Lodha
Omraje Nimbalkar : लोकांचे फोन उचलण्याशिवाय ओमराजेंनी काय काम केलं? अजित पवार गटाचे कळीच्या मुद्द्यावर बोट

मंत्री लोढा यांच्या निर्देशानुसार महापालिकेने कारवाई केलेली आहे. आता त्या गुंडाच्या घराचा फक्त तळ मजला शिल्लक असल्याचे माहिती आहे. याबाबत मंत्री लोढा म्हणाले, "जरीमरी येथील घटनेचा आढावा घेतला. त्यातून लक्षात आले की, येथील हिंदूंना त्रास देण्याचा मालवणी पॅटर्न सुरू आहे. हा प्रकार बंद झाला पाहिजे हीच भूमिका घेत योग्य ती कारवाई केली आहे आणि यापुढेही करणार आहे. येथील भूमीपुत्रांवर होणारा अन्याय सहन केला जाणार नाही," असा इशाराही लोढा यांनी दिला.

मुंबईतील हिंदूंच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर!

जरीमरी, साकीनाका येथे काही कट्टरपंथियांद्वारे धार्मिक तेढ निर्माण करुन स्थानिक हिंदू कुटुंबांना त्रास दिला. याच्या अनेक तक्रारी देऊनही दखल घेतली गेली नाही. उलट तक्रार केली म्हणून हिंदूंवर हल्ला करण्यात आला. यात पाच जण जखमी झाले आहेत. याची माहिती मिळताच घटनास्थळी जाऊन पीडित कुटुंबाची चौकशी केली. त्यानंतर पोलिस व महापालिका अधिकाऱ्यांना कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले. यापुढेही मुंबईतील हिंदुच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर राहणार असल्याचा लोढांनी यावेळी सांगितले.

(Edited by Sunil Dhumal)

Mangal Prabhat Lodha
Lok Sabha Election 2024 : आता निवडणुकीतही गुजरात-महाराष्ट्र भेद; पटोलेंच्या निशाण्यावर मोदी-शाह, नेमका मुद्दा काय?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com